Adani-Ambani Stocks Sakal
Share Market

Adani-Ambani Stocks: शेअर बाजारातील वादळात अदानी-अंबानींचे पैसे पाण्यात; मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घायाळ

Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीएला आघाडी मिळत आहे. पण इंडिया आघाडीही तगडी स्पर्धा देताना दिसत आहे. यावेळचे निकाल एक्झिट पोलच्या तुलनेत अगदी उलट आहेत.

राहुल शेळके

Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीएला आघाडी मिळत आहे. पण इंडिया आघाडीही तगडी स्पर्धा देताना दिसत आहे. यावेळचे निकाल एक्झिट पोलच्या तुलनेत अगदी उलट आहेत, ज्यामध्ये एनडीएला 350 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज होता. एक्झिट पोलमधून समोर आलेल्या ट्रेंडमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.

1 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 4053.71 अंकांनी घसरून 4053.71 वर आहे. तर निफ्टी 1,290.20 अंकांच्या घसरणीसह 21,973.70 वर आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे, तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि त्यांच्या उपकंपनी जिओ फायनान्शियलचे शेअर्सही घसरत आहेत. मुकेश अंबानींच्या इतर लिस्टेड कंपन्यांचे शेअर्सही घसरत आहेत.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बीएसईकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2731.10 अंकांसह खालच्या पातळीवर पोहोचले.

जर आपण मार्केट कॅपबद्दल बोललो तर रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 20,44,121.82 कोटी रुपये झाले होते. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान ते 18,47,811.70 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ रिलायन्सला इंट्राडे दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमधून 1,96,310.12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, अदानी समूहाच्या मार्केट कॅपमधून 2,57,453.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपची सर्वात मोठी कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप ट्रेडिंग सत्रात 41,530.79 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती (1 वाजता)

  • अदानी टोटल गॅस : 14.80 टक्के घट

  • अदानी एंटरप्रायझेस : 18.22 टक्के घसरण

  • अदानी पोर्ट्स : 19.35 टक्के घसरण

  • अदानी एनर्जी सोल्युशन्स: 17.55 टक्के घसरण

  • अदानी ग्रीन एनर्जीः 16.66 टक्के घसरण

  • अदानी विल्मार: 8.78 टक्के घसरण

  • अदानी पॉवर : 14.96 टक्के घसरण

अंबानींच्या कंपन्यांची स्थिती (सुमारे 1 वाजता)

  • रिलायन्स इंडस्ट्रीज: 7.21 टक्के घसरण

  • जिओ फायनान्शियल: 5.59 टक्के घसरण

  • DEN नेटवर्क: 7.14 टक्के घट

  • हॅथवे केबल: 6.21 टक्के घट

  • जस्ट डायल: 5.77 टक्के घट

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT