Adani Group Stocks Sakal
Share Market

Adani Group: एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाची खात्री; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तुफान वाढ

Adani Group Stocks: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज मोठी वाढ दिसून आली. सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. देशाची कमान पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे जाणार असल्याचे एक्झिट पोलमधून स्पष्ट झाले आहे.

राहुल शेळके

Adani Group Stocks: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज मोठी वाढ दिसून आली. सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. देशाची कमान पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे जाणार असल्याचे एक्झिट पोलमधून स्पष्ट झाले आहे.

एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. आज अदानी समूहाच्या 5 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 15 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

आज 3 जून 2024 रोजी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या वाढीनंतर समूहाचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनेक आरोप केले होते.

फसवणूक आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर शेअर बाजारात गोंधळ उडाला होता. यानंतर संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने सेबीला चौकशी करण्यास सांगितले. सेबीने सर्व प्रकरणे फेटाळली.

Adani Group Stocks

अदानी ग्रुपचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पार

शुक्रवारी झालेल्या वाढीनंतर मार्केट कॅपने 18 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याच वेळी, आज सोमवारी बाजार उघडताच, मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपये झाले आहे. हिंडनबर्ग प्रकरणापूर्वी अदानी समूहाचे मार्केट कॅप 24 लाख कोटी रुपये होते.

समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन एनर्जी या तीन कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा आकडा 67 लाखांवर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या वार्षिक अहवाल 2023-24 नुसार, मार्च 2019 ला संपलेल्या आर्थिक वर्षातील भागधारकांच्या संख्येपेक्षा ही संख्या सहा पटीने जास्त आहे.

आर्थिक वर्ष 19 मध्ये भागधारकांची संख्या 11 लाख होती. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गेल्या आठवड्यात एका वार्षिक अहवालात म्हटले की, समूहाने गेल्या वर्षी आलेल्या आव्हानांवर मात केल्याने त्यांचा संकल्प आणखी मजबूत झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT