Adani Group: शनिवारी पहाटे गाझा पट्टीतून हमासने इस्राइलवर रॉकेटने हल्ला करण्यात आला आणि युद्धाला सुरुवात झाली, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जनतेला स्पष्ट केले की युद्धाची सुरुवात झाली आहे. इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील वाद नवा नाही.
2021 मध्येही दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांनी एकमेकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. असेच दृश्य शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. हमासने गाझा पट्टीतून रॉकेटने हल्ला केला तर इस्राइलनेही प्रत्युत्तर दिले.
या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली असून त्यात भारतीय बाजाराचाही समावेश आहे. मात्र या युद्धामुळे गौतम अदानी यांची लिस्टेड कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा शेअर घसरला आहे. अदानी पोर्ट्सचा शेअर 4.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे आणि शेअर 800 रुपयांच्या खाली घसरला आहे.
इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. या युद्धामुळे इस्रायली बंदरांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. अदानी पोर्ट्स एका स्थानिक कंपनीच्या सहकार्याने उत्तर इस्रायलमधील हैफा बंदर चालवते.
या वर्षी जानेवारी 2023 मध्ये, अदानी पोर्ट्सने हैफा बंदर 1.2 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतले. हैफा बंदर हे इस्रायलचे मुख्य बंदर आहे ज्याद्वारे 99 टक्के माल समुद्र मार्गाने देशाबाहेर किंवा आत पाठवला जातो.
भारतीय व्यवसायावर परिणाम होऊ शकतो का?
पीटीआयच्या एका अहवालात म्हटले आहे की इस्राइलला माल पाठवणाऱ्या भारतीय निर्यातदारांना इस्राइल-हमास संघर्षामुळे जास्त विमा प्रीमियम आणि शिपिंग खर्चाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे 18,000 भारतीय नागरिक आहेत.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.