Adani Group Sakal
Share Market

Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका, आता अमेरिकेत गुंतवणूकदारांची चौकशी सुरू, शेअर्समध्येही घसरण

अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) याची चौकशी करत असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

राहुल शेळके

Adani Group: शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेत अदानी समूहातील गुंतवणूकदारांची चौकशी सुरू आहे. अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला होता.

यानंतर अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा केली. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) याची चौकशी करत असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

गुंतवणूकदारांची चौकशी

यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने अदानी समूहाच्या प्रमुख भागधारकांना विचारले आहे की त्यांनी समूहाशी काय चर्चा केली. या वर्षी जानेवारी महिन्यात हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता.

हिंडेनबर्गने आपल्या कंपन्यांमध्ये सांगितले होते की, अदानी समूहाने स्टॉकच्या किंमतींमध्ये फेरफार करण्यासाठी ऑफशोअर कंपन्यांचा वापर केला होता. यासोबतच रिसर्च फर्मने अदानी ग्रुपच्या मोठ्या कर्जाबाबतही चिंता व्यक्त केली. (Adani stocks crash after report says group under scrutiny of US regulators)

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांनी 11 अब्ज डॉलर संपत्ती गमावली.

ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की अदानी समूहात मोठ्या प्रमाणात भागीदारी असलेल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना ब्रुकलिनमधील वकील कार्यालय आणि एसईसी यांनी अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांना काय सांगितले आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

इतर दोन लोकांनी ब्लूमबर्गला सांगितले की एसईसीने अलिकडच्या काही महिन्यांत तपासणी सुरू केली आहे.

अदानी समूहाच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गला सांगितले की गुंतवणूकदारांना कोणत्याही समन्सबद्दल माहिती नाही. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाची भारतात आधीच नियामक तपासणी सुरू आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले:

तपासाच्या वृत्तानंतर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. सलग तिसर्‍या सत्रात शेअर्सची घसरण झाली. शेअर 9.73 टक्‍क्‍यांनी घसरून 2,162.85 रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर आला.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 8.92 टक्क्यांनी घसरून 2,182.10 रुपयांवर व्यवहार करत होते. अदानी पोर्ट्स 4.8 टक्क्यांनी घसरून 709.75 रुपयांवर आला. अदानी पॉवर 5.12 टक्क्यांनी घसरून 243.65 रुपयांवर आला.

अदानी ट्रान्समिशन 6.88 टक्क्यांनी घसरून 749.50 रुपयांवर आणि अदानी ग्रीन एनर्जी 2.6 टक्क्यांनी घसरून 948.75 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी टोटल गॅस 3.47 टक्क्यांनी घसरून 632.40 रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी विल्मार 2.98 टक्क्यांनी घसरून 405.90 रुपयांवर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT