Allcargo goes for another restructuring: Here’s how it’s beneficial for shareholders  Sakal
Share Market

Allcargo Logistics: ऑलकार्गोकडून डीमर्जरची घोषणा, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

Allcargo Logistics: ऑलकार्गो लॉजिस्टिक्सने आपला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीचे बिझनेस स्ट्रक्चर सुलभ होईल आणि त्याची कार्यक्षमताही वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

राहुल शेळके

Allcargo Logistics: ऑलकार्गो लॉजिस्टिक्सने (Allcargo Logistics) आपला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीचे बिझनेस स्ट्रक्चर सुलभ होईल आणि त्याची कार्यक्षमताही वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या डिमर्जरच्या घोषणेनंतर, ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचे शेअर्स शुक्रवारी 7 टक्क्यांहून अधिक वाढले आणि शेवटी 307.50 रुपयांवर बंद झाले.

ऑलकार्गो ग्रुप हा जगातील आघाडीच्या लॉजिस्टिक ग्रुपपैकी एक आहे. हा ग्रुप आपला इंटरनॅशनल सप्लाय चेन (ISC) बिझनेस वेगळा करेल आणि ऑलकार्गो ईसीयू लिमिटेड (Allcargo ECU Ltd) नावाची नवीन कंपनी स्थापन करेल.

यामध्ये कंपनीच्या इंटरनॅशनल सप्लाय चेन बिझनेस भारतीय हिस्सा आणि ईसीव्ही वर्ल्डवाइड एनव्ही अंतर्गत आंतरराष्ट्रीय सब्सिडियरीजचाही समावेश असेल.

दुसरीकडे, एक्सप्रेस बिझनेस आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स व्यवसाय आता ऑलकार्गो लॉजिस्टिक्स नावाच्या कंपनीच्या अंतर्गत येणार आहे. डिमर्जरनंतर, ऑलकार्गो ग्रुपचे चार बिझनेस एंटरप्रायझेस असतील.

यामध्ये ऑलकार्गो इसीयू लिमिटेड, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स, ऑलकार्गो टर्मिनल्स लिमिटेड आणि ट्रांसइंडिया रियल एस्टेट लिमिटेड यांचा समावेश आहे. कंपनी पुढील 10-12 महिन्यांत हे मर्जर पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्सने गती लिमिटेडला 2022 मध्ये सुमारे 416 कोटीना विकत घेतले होते. हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बिझनेसला लॉजिस्टिक्स सेवा देते. यापूर्वी ऑलकार्गो ग्रुपने ऑलकार्गो लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सइंडिया रिअल इस्टेटचे डीमर्जर पूर्ण केले होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT