Apeejay Surrendra Park Hotels IPO Sakal
Share Market

IPO News: पंचतारांकित हॉटेल चालवणाऱ्या कंपनीचा IPO येणार; काय आहे प्राइस बँड?

Apeejay Surrendra Park Hotels IPO: शेअर बाजारातून कमी वेळेत जास्त कमाई करायची असेल तर गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी आणखी एक आयपीओ शेअर बाजारात येणार आहे. एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स आयपीओ घेऊन येत आहे.

राहुल शेळके

Apeejay Surrendra Park Hotels IPO: शेअर बाजारातून कमी वेळेत जास्त कमाई करायची असेल तर गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी आणखी एक आयपीओ शेअर बाजारात येणार आहे. एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स (APJ Surendra park hotels) आयपीओ घेऊन येत आहे.

कंपनी प्रायमरी मार्केटमधून शेअर बाजारात प्रवेश करेल आणि गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची संधी मिळेल. तुम्हालाही आयपीओमधून पैसे कमवायचे असतील तर याचे डिटेल्स जाणून घेऊयात.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्सने त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी अर्थात आयपीओसाठी 147-155 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्सच्या मते, कंपनीची आयपीओद्वारे 920 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

नवीन शेअर्सद्वारे 600 कोटी रुपये आणि विक्री ऑफरद्वारे 320 कोटी रुपये उभारण्याचे टारगेट आहे. हा आयपीओ 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सुरू होईल. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ एक दिवस आधी खुला होईल. एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्सची स्थापना 1987 मध्ये झाली होती.

Apeejay Surrendra Park Hotels च्या प्रवर्तकांमध्ये करण पॉल, प्रिया पॉल, Apeejay Surrendra Trust आणि Great Eastern Stores Pvt. Ltd यांचा समावेश आहे. सध्या, पार्क हॉटेल्समध्ये प्रवर्तकांची 94.18 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 5.82 टक्के शेअर्स जनतेकडे आहेत.

सार्वजनिक शेअरहोल्डिंगपैकी 5.53 टक्के हिस्सा RECP IV पार्क हॉटेल गुंतवणूकदारांकडे आहे. कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्सपासून मिळणारे पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरेल. पार्क हॉटेल्सकडे 2 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 582.28 कोटी रुपयांची थकबाकी होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT