Apple becomes the most valuable company Sakal
Share Market

Apple Company: ॲपलने मायक्रोसॉफ्टला टाकले मागे; पुन्हा बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी

Apple Stock Price: मायक्रोसॉफ्टला मागे टाकत ॲपलने पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान पटकावला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात ॲपलचा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 211.75 डॉलरवर पोहोचला. त्यानंतर ॲपलचे बाजार भांडवल 3.25 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

राहुल शेळके

Apple M-Cap: मायक्रोसॉफ्टला मागे टाकत ॲपलने पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान पटकावला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात ॲपलचा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 211.75 डॉलरवर पोहोचला. त्यानंतर ॲपलचे बाजार भांडवल 3.25 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल 3.24 ट्रिलियन डॉलरवर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत ॲपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ॲपलच्या स्टॉकमध्ये वाढ होण्यामागची कारणे पाहिल्यास, तज्ञांचे म्हणणे आहे की सॉफ्टवेअर अपग्रेडेशनसह त्याच्या उपकरणांमध्ये वाढत्या एआय फीचरमुळे, ॲपल आयफोनच्या विक्रीत मोठी वाढ होऊ शकते. सोमवारी, 10 जून रोजी ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ॲपलच्या वार्षिक परिषदेत या गोष्टी सांगितल्या.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ॲपल मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेटसारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे असूनही ॲपलच्या कामगिरीत अलीकडच्या काळात सुधारणा दिसून येत आहे. ॲपलच्या स्टॉकमध्ये 2024 मध्ये 10 टक्के वाढ झाली आहे, तर मायक्रोसॉफ्टच्या स्टॉकमध्ये 16 टक्के आणि अल्फाबेटच्या स्टॉकमध्ये 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.

बुधवारच्या सत्रात अमेरिकन शेअर बाजारात वेगाने व्यवहार करत होते. डाऊ जोन्स 92 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता तर Nasdaq 1.85 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. S&P 500 देखील वेगाने व्यापार करत होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT