IPO Open  sakal
Share Market

IPO Open : अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरीचा आयपीओ खुला, जाणून घ्या डिटेल्स

सकाळ वृत्तसेवा

अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरीचा आयपीओ (Aztec Fluids & Machinery) आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. यासाठी प्राइस बँड 63-67 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. लॉट साइज 2000 शेअर्स आहे. कंपनी 24.12 कोटीहून अधिक उभारण्याच्या तयारीत आहे. आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी 14 मे पर्यंत वेळ असेल. बीएसई आणि एसएमईवर 17 मे रोजी शेअर्सची लिस्टिंग होऊ शकते. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 6.85 कोटी रुपये उभे केले आहेत.

2011 मध्ये स्थापन झालेली अझ्टेक फ्लुइड्स अँड मिशनरी लिमिटेड विविध उद्योगांना प्रिंटर, छपाई साहित्य आणि प्रिंटरचे सुटे भाग वितरित करते. पब्लिक इश्यूमध्ये 36 लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. यात कोणतीही ऑफर फॉर सेल नाही. आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर हेम सिक्युरिटीज लिमिटेड आहे. रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत. मार्केट मेकर हेम फिनलीज आहे.

अहमदाबादस्थित अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरीच्या आयपीओमध्ये, 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर जेट इंक्स प्रायवेट लिमिटेडमधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी, सध्याची कर्जे कमी करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल. पुलिन कुमुदचंद्र वैद्य, अमिषा पुलिन वैद्य आणि कुमुदचंद्र भगवानदास वैद्य हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

अझ्टेक फ्लुइड्स अँड मशिनरीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 67 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडमध्ये 35 रुपये अर्थात 52.24 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत, महसूल 51.82 कोटी नोंदवला गेला आणि निव्वळ नफा 4.50 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT