Bajaj Finance approves Rs 10,000 crore fund raise via QIP, preferential issue Sakal
Share Market

Bajaj Finance: बजाज फायनान्स कंपनीने घेतला मोठा निर्णय, शेअरवर होणार परिणाम?

Bajaj Finance: शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली.

राहुल शेळके

Bajaj Finance: बजाज फायनान्सच्या संचालक मंडळाने निधी उभारण्याबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. एकूण 10 हजार कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला बोर्डाने मंजुरी दिली आहे. गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली. गुरुवारच्या व्यवहारात बजाज फायनान्सचा शेअर किंचीत घसरणीसह बंद झाला. आजच्या निर्णयाचा परिणाम शुक्रवारच्या व्यवहारातील शेअरवर दिसून येण्याची शक्यता आहे.

कंपनीने काय माहिती दिली?

शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंटच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त 8,800 कोटी रुपये उभारणार आहे. यासह, प्रमोटर बजाज फिनसर्व्ह कन्व्हर्टेबल वॉरंट जारी करून इश्यूद्वारे जास्तीत जास्त 1,200 कोटी रुपये उभारले जातील. अलीकडेच कंपनीने माहिती दिली आहे की दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या कर्जामध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअर बाजार बंद झाल्यानंतर निधी उभारणीची बातमी आली आहे. आज बजाज फायनान्सचा शेअर किंचित घसरणीसह बंद झाला. व्यवहारादरम्यान शेअरमध्ये वाढ झाली. व्यापारादरम्यान शेअर 7,913 च्या पातळीवर वाढला होता. 22 सप्टेंबर रोजी जेव्हा कंपनीने निधी उभारण्याच्या योजनेची माहिती दिली होती, तेव्हा शेअर 7,472 च्या पातळीवर होता. त्यानंतर शेअरमध्ये वाढ झाली होती.

कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, बजाज फायनान्सने आर्थिक वर्ष 24 च्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 3,437 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण 32 टक्क्यांनी अधिक आहे. जून तिमाहीत कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न देखील वार्षिक 26 टक्क्यांनी वाढून 8,398 कोटी रुपये झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांत बजाज फायनान्सचा शेअर 21 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवर 4 ऑक्टोबर रोजी शेअर 7,910 रुपयांवर बंद झाला.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT