berger paints share market stock analysis investment in marathi Sakal
Share Market

Berger Paints : बर्जर पेंट्स (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ५५४)

बर्जर पेंट्स ही भारतातील दुसरी सर्वांत मोठी पेंट कंपनी आहे. धोरणात्मक दृष्टीने केलेली उत्पादनक्षमतेतील वाढ, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि प्रभावी विपणन खर्च या त्रिसूत्रीमुळे या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करत, ही कंपनी देशांतर्गत पेंट उद्योगात व्यवसायवृद्धी करत आहे.

भूषण गोडबोले

बर्जर पेंट्स ही भारतातील दुसरी सर्वांत मोठी पेंट कंपनी आहे. धोरणात्मक दृष्टीने केलेली उत्पादनक्षमतेतील वाढ, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि प्रभावी विपणन खर्च या त्रिसूत्रीमुळे या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करत, ही कंपनी देशांतर्गत पेंट उद्योगात व्यवसायवृद्धी करत आहे.

सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीचा महसूल २,८८२ कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ नफा सुमारे ३०० कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीचा तिमाही निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे ४९ टक्क्यांनी वाढला आहे. मागील तीन तिमाही निकालांनुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे ९४७ कोटी रुपयांवर पोचला आहे.

छोट्या शहरांत मोठा व्यवसाय

बर्जर पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित रॉय यांच्या म्हणण्यानुसार, टियर दोन आणि टियर तीन शहरांमधील व्यवसायवृद्धीचा दर टियर एक शहरांपेक्षा जास्त आहे. कंपनीने वॉटरप्रूफिंग; तसेच बांधकाम रसायनांच्या विभागातदेखील आक्रमक वाढ सुरू ठेवली आहे.

व्यवसायाच्या वाढीसाठी कंपनीने सीलंट आणि छतावरील वॉटरप्रूफिंग श्रेणीमध्ये नवी उत्पादने सादर केली आहेत. कंपनीने या तिमाहीत सुमारे २३०० हून अधिक रिटेल टच पॉइंट जोडले असून, डिजिटल सेवेवरही भर दिला आहे.

याचा फायदा व्यवसायवाढीला होत आहे. व्यवसायवृद्धीकरिता कंपनीकडे मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील उत्पादन सुविधांसह ६० हजारांपेक्षा अधिक डीलर आणि किरकोळ विक्रेत्यांचे सक्षम वितरण जाळे आहे. विक्रीवाढीसाठी (कोको) स्वमालकीची आणि कंपनी-संचलित स्टोअरदेखील कार्यरत आहेत.

कर्जाचे प्रमाण कमी ठेवत गुंतविलेल्या भांडवलावर प्रति वर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता; तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन दीर्घावधीच्या दृष्टीने या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT