Profitable Share To Buy : पॉलीस्टीरिन पॉलिमरची निर्मिती आणि निर्यात करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुप्रीम पेट्रोकेमच्या (Supreme Petrochem) शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे.
पण यावर्षीचा विचार केल्यास कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत आणि मंगळवारी बीएसईवर 1.24 टक्क्यांनी घसरून 366 रुपयांवर बंद झाले. (Best Profitable Share To Buy is Supreme Petrochem read what expert said)
मात्र, शेअर बाजारातील तज्ज्ञांनी यामध्ये तेजीची शक्यता वर्तवत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीती पॉलिस्टीरिन तयार करते जी डिस्पोजेबल प्लास्टिक कटलरी आणि डिनरवेअर, सीडी ज्वेल केस, स्मोक डिटेक्टर हाउसिंग, लायसन्स प्लेट फ्रेम्स, प्लास्टिक मॉडेल असेंब्ली किट्स बनवण्यासाठी वापरली जाते.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीने कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये 11.3 टक्के आणि सीएजीआर (चक्रवाढ वार्षिक वाढ दर) 10 टक्क्यांनी वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीच्या कमकुवत कामगिरीमुळे, कंपनीने आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 च्या अंदाजात कपात केली आहे. पण फर्मने 427 रुपयांच्या टारगेटसाठी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
सुप्रीम पेट्रोकेमचे शेअर्स 15 फेब्रुवारी 2002 रोजी केवळ अडीच रुपयांना मिळत होते. आता त्याची किंमत 366 रुपये आहे. म्हणजेच 21 वर्षांत केवळ 69 हजारांच्या गुंतवणूकीवर गुंतवणुकदार कोट्यधीश झालेत. गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी 2022 रोजी हे शेअर्स 315 रुपयांवर होते, जो एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे.
यानंतर पुढच्याच महिन्यात 28 मार्च 2022 पर्यंत 53 टक्क्यांची तेजीसह त्यांनी 513.53 रुपयांचा उच्चांक गाठला. पण त्यानंतर विक्रीचा दबाव आला, आणि आता शेअर्समध्ये 29 टक्के घसरण झाली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.