Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ज्या क्षेत्रांमध्ये भरघोस नफा होऊ शकतो, त्या क्षेत्रांबद्दल गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे. या बाबत स्पार्क कॅपिटल वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक (इक्विटी सल्लागार) देवांग मेहता यांनी माहिती दिली आहे. ज्या क्षेत्रांमध्ये मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत त्याबद्दल ते म्हणाले की, ज्या क्षेत्रांना सरकारच्या भांडवली खर्चाचा फायदा होईल अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या चांगल्या संधी दिसत आहेत.
याशिवाय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. ते म्हणाले की, ही क्षेत्रे अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर गुंतवणुकीसाठी केवळ आकर्षक दिसत नाहीत तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायद्याची आहेत. याचे कारण भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या पुढील चक्रात प्रवेश करत आहे.
2024 च्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक विभागाच्या अपेक्षा
मेहता म्हणाले की, एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. व्याजदर, महागाई आणि भू-राजकीय ताणतणावांवर बारीक नजर राहील.
ते म्हणाले की, गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील चढउतार स्वीकारावे लागतील. याला घाबरण्याची गरज नाही. या वर्षी जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प येईल. 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प येणार आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यातून खूप अपेक्षा आहेत.
पायाभूत सुविधांवर सातत्याने गुंतवणूक वाढत आहे
ते म्हणाले की, सरकार पायाभूत सुविधांवर गुंतवणूक वाढवत आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च जीडीपीच्या 1.13 टक्के होता. सरकारने अर्थसंकल्पात निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात ते GDP च्या 3.3 टक्के असेल.
सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे. विशेषत: रेल्वे, संरक्षण आणि रस्ते यावर अधिक भर आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी असेल.
अर्थसंकल्पानंतर 'या' क्षेत्रांचे शेअर्स वाढतील
मेहता म्हणाले की, पायाभूत सुविधा, भांडवली वस्तू, ऊर्जा आणि आरोग्य सेवा क्षेत्रे चांगली दिसत आहेत. या क्षेत्रांना केवळ अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांमुळे पाठिंबा मिळणार नाही तर आर्थिक विकास दर वाढीचा थेट फायदाही होईल. आपण 2024 या वर्षात प्रवेश केला आहे, जेव्हा लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या शेअर्ससाठी शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे.
मधल्या काळात बाजारात सुधारणा झाली आहे. पण ही सुधारणा बाजारासाठी आरोग्यदायी आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली विक्री हे याचे प्रमुख कारण आहे. गेल्या पाच दिवसांत त्यांनी 27,830 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.