Titan share price Sakal
Share Market

Tata Group: निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय अन् रतन टाटांनी केली 19 हजार कोटींची कमाई; नेमकं काय घडलं?

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयातीवरील कर 6 टक्क्यांनी कमी केला आहे.

राहुल शेळके

Custom Duty On Gold: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयातीवरील कर 6 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानंतर रतन टाटांच्या प्रीमियम कंपन्यांपैकी एक असलेल्या टायटनच्या मूल्यांकनात 19 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली होती. रतन टाटांच्या टायटन कंपनीचा तनिष्क हा ज्वेलरी ब्रँड आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये किती वाढ झाली आणि कंपनीच्या मार्केट कॅप किती वाढले जाणून घेऊया?

टायटनच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

रतन टाटा यांच्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, टायटनचा शेअर 6.63 टक्क्यांच्या वाढीसह 3,468.15 रुपयांवर बंद झाला.

ट्रेडिंग सत्रादरम्यान, टायटनच्या शेअर्सनी 7.30 टक्क्यांच्या वाढीसह 3,490 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. मात्र, टायटन कंपनीचे शेअर्स 3,252 रुपयांवर उघडले होते. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.

कंपनीच्या मूल्यांकनात वाढ

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या मूल्यांकनातही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायटनच्या मूल्यांकनात 19 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एका दिवसापूर्वी टायटनचे मार्केट कॅप 2,88,757.16 कोटी रुपये होते.

जे मंगळवारी वाढून 3,07,897.56 कोटी रुपये झाले. याचा अर्थ कंपनीच्या मूल्यांकनात 19,140.4 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा

जर आपण शेअर बाजारातील गुंतवणूकदारांबद्दल बोललो तर त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. एक उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे टायटनचे 10,000 शेअर्स असतील.

तर एका शेअरमध्ये 215.55 रुपयांच्या वाढीनुसार गुंतवणूकदाराला 10 हजार शेअर्सवर 21,55,500 रुपयांचा नफा झाला आहे. येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना हा नफा अधिक दिसू शकतो.

कंपनीचे शेअर्स का वाढले?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला. सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमाशुल्कातील कपात ही दागिने उद्योगांची प्रलंबित मागणी होती.

या निर्णयानंतर देशातील बाजारात सोन्याच्या भावात 5 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, व्यवहाराच्या सत्रात चांदीच्या भावात पाच हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असेल तर या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT