Stock Market Crash Sakal
Share Market

Stock Market: पुढील आठवड्यातही बाजार कोसळणार? करोडो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता, चीन ठरतोय कारण

Stock Market: पुढच्या आठवड्यात चीन मोठी घोषणा करणार आहे. ज्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांवर दिसू शकतो. अशा परिस्थितीत चीन पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणार आहे.

राहुल शेळके

Stock Market: पुढच्या आठवड्यात चीन मोठी घोषणा करणार आहे. ज्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांवर दिसू शकतो. अशा परिस्थितीत चीन पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणार आहे, जी मागील महिन्यात केली होती. साहजिकच, यावेळीही चीनचा डाव भारतीय गुंतवणूकदारांना महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्लूमबर्गने 23 आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या सर्वेक्षणानंतर दावा केला आहे की, चीन सरकार पुढील आठवड्यात 283 अब्ज डॉलर (सुमारे 24 लाख कोटी रुपये) चे मदत पॅकेज जारी करणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये चीनने 12 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते.

त्यानंतर शांघाय स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅप सुमारे 269 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. याउलट, भारतीय शेअर बाजारात सलग 5 सत्रांमध्ये घसरण दिसून आली आणि गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी दुप्पट मदत पॅकेज जारी केल्यास त्याचाही दुप्पट परिणाम होऊ शकतो, असा अंदाज गुंतवणूकदार आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.

भारतावर का परिणाम होईल?

गेल्या आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर त्याचे उत्तर तुम्हालाच मिळेल. खरं तर, चीनच्या मदत पॅकेजच्या घोषनेनंतर अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार दोन्हीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. बाजारातील मागणीही वाढली, कारण व्याज कमी करून 5 कोटी लोकांना थेट फायदा झाला.

भारताच्या तुलनेत चीनच्या बाजारपेठेची व्याप्ती वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी येथून पैसे काढून तिथे टाकण्यास सुरुवात केली. फॉरेन इन्व्हेस्टर पोर्टफोलिओ (FPI) ची गुंतवणूक कमी होताच बाजारात घसरण सुरू होते.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून एफपीआयने भारतीय बाजारातून सुमारे 20 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. ज्याचा परिणाम घसरणीच्या रूपात दिसून आला. एफपीआयने पुन्हा माघार घेण्यास सुरुवात केल्यास पुढील आठवड्यातही बाजाराला घसरण होण्याची भीती आहे.

अर्थतज्ज्ञ काय म्हणतात?

इंटरनॅशनल बिझनेस स्कूल INSEAD मधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक पुशन दत्त म्हणतात की, चीनचे लक्ष देशांतर्गत आघाडीवर थेट दिलासा देण्याऐवजी रिअल इस्टेट गुंतवणूक सुधारण्याच्या मार्गावर आणण्यावर आहे, जेणेकरून त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकेल. चीनचे अर्थमंत्री शनिवारी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा करू शकतात, असा अंदाज आहे.

चीन मदत पॅकेज का जाहिर करत आहे?

कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण केले होते. चीनला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. यामुळे केवळ अर्थव्यवस्थाच मंदावली नाही, तर सरकार आणि जनतेच्या खर्चातही लक्षणीय घट झाली. त्याचा परिणाम चीनच्या व्यवसायावरही दिसून आला. जगातील सर्वात मोठ्या कारखान्यातील औद्योगिक वाढही मंदावली. साहजिकच यातून बाहेर पडण्यासाठी चीनने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणामही दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT