Cochin Shipyard and Texmaco rail get big order Keep an eye on the shares, the possibility of a boom  Sakal
Share Market

Stocks in News: 'या' दोन कंपन्यांना मिळाल्या मोठ्या ऑर्डर; शेअर्सवर ठेवा लक्ष, तेजीची शक्यता

Stocks in News: काल शेअर बाजार बंद झाल्यानंतर दोन कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी तेजी पाहायला मिळू शकते. ही ऑर्डर जहाजाच्या शॉर्ट रिफिटशी संबंधित आहे.

राहुल शेळके

Stocks in News: बुधवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर दोन कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळेच गुरुवारी या दोन कंपन्यांच्या शेअर्सवर तुमची नजर असणे आवश्यक आहे. कारण दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी तेजी पाहायला मिळू शकते. यातली एक कंपनी कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) आणि दुसरी कंपनी टेक्समॅको रेल (Texmaco rail) आहे.

कोचीन शिपयार्डला संरक्षण मंत्रालयाकडून 488.25 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर भारतीय नौदलाच्या जहाजाच्या शॉर्ट रिफिटशी संबंधित आहे.

कोचीन शिपयार्ड ही देशाची प्रमुख जहाज बांधणी आणि दुरुस्ती कंपनी आहे जी संरक्षण आणि व्यावसायिक दोन्ही विभागांमध्ये काम करते. नुकताच हा शेअर 6.4 टक्क्यांच्या घसरणीसह 1225 रुपयांवर बंद झाला. पण या वर्षी आतापर्यंत या शेअरने 130 टक्के परतावा दिला आहे.

एक्सचेंज डेटानुसार, टेक्समॅको रेलला (Texmaco rail) भारतीय रेल्वेकडून 3400 BOXNS वॅगन तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 1374.41 कोटींची आहे. कंपनीला 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1133 वॅगनचा पहिला टप्पा पूर्ण करायचा आहे.

सर्व वॅगनची डिलिव्हरी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे. नुकतीच या शेअरमध्ये जवळपास 9 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि तो सध्या 163 रुपयांवर ट्रेड करत आहे. यावर्षी आतापर्यंत हा शेअर 190 टक्क्यांनी वाढला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT