dabur india share price slips after group chairman director named in fir in mahadev betting app scam  Sakal
Share Market

Dabur Share Price: महादेव अ‍ॅपमुळं डाबर कंपनी गोत्यात; कंपनीच्या शेअर्सचे भाव अडीच टक्क्यांनी घसरले

Dabur Share Price: आज डाबर इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Dabur Share Price: आज डाबर इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, डाबरचे शेअर्स इंट्रा-डेमध्ये अडीच टक्क्यांहून अधिक घसरले.

कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका घोटाळ्यातील पोलिसांच्या कारवाईमुळे झाली आहे. महादेव अॅप बेटिंग घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये डाबर ग्रुपचे अध्यक्ष आणि संचालक बर्मन यांचेही नाव आहे.

त्यामुळे आज डाबरचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत आणि इंट्रा-डेमध्ये ते BSE वर 2.56 टक्क्यांनी घसरून 516.60 रुपयांवर आले. सध्या ते 0.95 टक्क्यांच्या घसरणीसह 525.10 रुपयांवर आहेत.

मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मोहित बर्मन हा 16वा आणि गौरव बर्मन हा 18वा आरोपी आहे. या एफआयआरमध्ये एकूण 31 जणांची नावे आहेत, तर एका अज्ञात व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबरला हा गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरबाबत डाबरने रात्री उशिरा निवेदन जारी केले आहे. डाबर ग्रुपचे म्हणणे आहे की, या एफआयआरबाबत त्यांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. या प्रकरणातील आरोपी गौरव बर्मन किंवा मोहित बर्मन या दोघांनाही याची माहीत नाही.

एफआयआरमध्ये अध्यक्ष आणि संचालकांची नावे समोर आल्यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून या एफआयआरबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की एफआयआर अशा वेळी उघडकीस आला आहे जेव्हा बर्मन कुटुंब रेलिगेअर एंटरप्रायझेसमधील विद्यमान 21.24 टक्के स्टेक वाढविण्यावर काम करत आहे.

सीएनबीसी टीव्ही-18 शी बोलताना डाबरचे मोहित बर्मन म्हणाले की, स्टेक वाढवण्यास लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. यावेळी बिनबुडाचे आरोप आणि चिखलफेक सुरूच राहणार असून कंपनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT