Hero MotoCorp Share: हिरो मोटो कॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ आणखी एका संकटात अडकले आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास करत होते आणि आता दिल्ली पोलिसांनीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी पवन मुंजाळ आणि इतर आरोपींविरुद्ध बनावट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पवन मुंजाळ यांच्यावर बनावट बिले बनवून ती आयकर विभागात जमा करून सेवा कराचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. ही बिले हीरो मोटोकॉर्पला मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या नावावर करण्यात आली होती.
पवन मुंजाळ व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी विक्रम सीताराम कसबेकर, हरी प्रकाश गुप्ता, मंजुळा बॅनर्जी आणि हिरो मोटो कॉर्प यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्रेन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक रूप दर्शन पांडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीमुळे सोमवारी 9 ऑक्टोबर 2023 च्या ट्रेडिंग सत्रात शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीचा शेअर 2.75 टक्क्यांहून अधिक घसरला. सध्या शेअर 2,950 रुपयांवर व्यवहार करत आहे.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने पवन मुंजाळ यांच्यासह काही लोकांच्या घरावर छापे टाकले होते. ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात केली होती ज्यात ईडीने मुंजाळ यांच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील घरे आणि कार्यालयांची झडती घेतली होती. या संदर्भात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये यापूर्वीच एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
गेल्या वर्षी आयकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी मुंजाळ आणि त्यांच्याशी संबंधित इमारतींचीही झडती घेतली होती. तेव्हा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की त्यांनी चुकीच्या पद्धतीने खर्च केलेल्या 800 कोटी रुपयांचा तपास लागला होता. याशिवाय दिल्लीत जमीन खरेदी करण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा वापर केल्याची माहिती कागदपत्रांवरून मिळाल्याचे आयकर विभागाने म्हटले होते.
हिरो मोटोकॉर्पनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीनं म्हटलं की, "हिरो मोटोकॉर्पसंदर्भात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीत कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात FIR दाखल झाल्याचं म्हटलं आहे. पण हे जुनं २००९-१० मधील प्रकरण असून असंतुष्ट असलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरबाबतचं हे प्रकरण आहे. ब्रेन्स लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमोटर रुपदर्शन पांडे यांच्यासंदर्भातील आहे. त्याचबरोबर तक्रारदारानं कंपनीच्या अधिकाऱ्याचा उल्लेख केला आहे. पण अधिकृतरित्या त्याचं नाव FIR मध्ये नाही. सन २०१३ मध्ये मोटो कॉर्पनं या तक्रारदारांविरोधात FIR दाखल केला होता, सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.