Diwali 2023 Stock Picks Religare Broking, Motilal Oswal, Kotak Securities list top picks for Samvat 2080  Sakal
Share Market

Diwali 2023 Stock Picks : दिवाळीत कोणते शेअर्स करतील मालामाल? ब्रोकरेज फर्मने जाहीर केली यादी

Muhurat Trading Stock Picks: जागतिक बँका आणि वित्तीय संस्थांनीही भारतीय बाजाराबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.

राहुल शेळके

Diwali 2023 Stock Picks: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गेल्या वर्षीची दिवाळी आणि यंदाची दिवाळी ही खास ठरली आहे. कारण निफ्टी 20,000 चा आकडा पार करण्यात यशस्वी झाला तर सेन्सेक्सने 68,000 चा आकडा गाठला.

या एका वर्षात निफ्टीने 10 टक्के परतावा दिला आहे तर सेन्सेक्सनेही सुमारे 13.50 टक्के वाढ दिली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 30 टक्के आणि 36 टक्के वाढ दिसून आली आहे.

जागतिक बँका आणि वित्तीय संस्थांनीही भारतीय बाजाराबद्दल आशावाद व्यक्त केला आहे. सध्याच्या बाजार परिस्थितीमध्ये, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने दिवाळी 2023 शेअर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. ब्रोकरेजने दर्जेदार शेअर्स निवडले आहेत.

1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): लक्ष किंमत: 4,089 रुपये; अपेक्षीत वाढ: 20.9 टक्के

2. आयटीसी (ITC) : लक्ष किंमत: 535 रुपये; अपेक्षीत वाढ: 22.4 टक्के

3. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) : लक्ष किंमत: 1,167 रुपये; अपेक्षीत वाढ: 14.2 टक्के

4. मारुती सुझुकी इंडिया: लक्ष किंमत: 12,714 रुपये; अपेक्षीत वाढ: 23.2 टक्के

5. SBI लाइफ इन्शुरन्स: लक्ष किंमत: 1,644 रुपये; अपेक्षीत वाढ: 22.2 टक्के

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल

स्टॉक ब्रोकिंग कंपनी मोतीलाल ओसवालने शेअर बाजाराचा अंदाज आणि या दिवाळीसाठी चांगल्या शेअर्सचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, संवत 2080 देखील शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले असेल अशी अपेक्षा आहे.

या संवतात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्याकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. या संवतात RBI व्याजदरांबाबत काय निर्णय घेते याकडे बाजार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक तणावामुळे बाजारात अस्वस्थता आहे. जागतिक अनिश्चितता असूनही, भारतात चांगली वाढ दिसत आहे. निफ्टी कंपन्या 2022-23 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये महसुलात 18 टक्के वाढ दर्शवू शकतात.

दरवर्षी प्रमाणे याही दिवाळीत मोतीलाल ओसवाल यांनी 10 टॉप स्टॉक कोणते ते सांगितले आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय तसेच टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, सिप्ला, इंडियन हॉटेल्स, दालमिया भारत या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

1. SBI शेअर्स 22 टक्के परतावा देईल

मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयचा शेअर 574 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि ब्रोकरेज हाऊसच्या मते, संवत 2080 मध्ये शेअर 700 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे SBI चे शेअर्स 22 टक्के परतावा देऊ शकतात.

2. टायटनच्या शेअर्समध्ये 19 टक्के वाढ

टायटनसाठी संवत 2079 उत्कृष्ट ठरले आहे आणि संवत 2080 हे वर्ष देखील उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना टायटनचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे जो सध्या 3270 रुपयांवर व्यवहार करत आहे. टायटनचा स्टॉक 3900 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. येत्या काही दिवसांत हा शेअर 19 टक्के परतावा देऊ शकतो.

3. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये तेजी

ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकदारांना महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चा ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे जो सध्या 1492 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि शेअर 19 टक्क्यांच्या तेजीसह 1770 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

4. Cipla 21 टक्के परतावा देईल

ब्रोकरेज हाऊसने फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना 1203 रुपयांवर व्यवहार करणारे सिप्ला शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सिप्ला स्टॉक 1450 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच संवत 2080 मध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा देऊ शकतो.

5. भारतीय हॉटेल्समध्ये तेजी

ताज ग्रुप ऑफ हॉटेल चेन चालवणारी टाटा ग्रुप कंपनी इंडियन हॉटेल्सच्या स्टॉकवर मोतीलाल ओसवाल देखील तेजीत आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या मते, गुंतवणूकदारांनी 22 टक्के परतावा आणि 480 रुपयांच्या लक्ष किंमतीसाठी 395 रुपयांच्या सध्याच्या किंमतीवर इंडियन हॉटेल्सचा स्टॉक खरेदी करावा.

कोटक सिक्युरिटीज

कोटक सिक्युरिटीजने सुचवलेल्या दिवाळीतील शेअर्समध्ये सिप्ला, सेंट आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. कोटक सिक्युरिटीजने म्हटले आहे की संवत 2080 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने या शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळण्यास मदत मिळू शकते.

1. कॅनरा बँक : सध्याचा बाजारभाव: 384 रुपये, लक्ष किंमत: 425 रुपये

2. रिलायन्स इंडस्ट्रीज : सध्याचा बाजारभाव: 2,288 रुपये, लक्ष किंमत: 2,725 रुपये

3. सिप्ला: सध्याचा बाजारभाव: 1,200 रुपये, लक्ष किंमत: 1,320 रुपये

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT