Multibagger Stocks: बॉयोफ्यूएल कंपनी प्राजच्या (Praj) शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. या शेअर्सने चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 36% पेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, या शेअर्समध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे, आणि ती सध्याच्या पातळीपासून 23 टक्क्यांच्या वर जाऊ शकते. सध्या हे शेअर्स 408 रुपयांवर ट्रेड करत आहेत. इंडियन ऑइलसोबतच्या भागीदारीमुळे बाजारातील तज्ज्ञ प्राजबाबत पॉझिटीव्ह आहेत.
प्राजचे शेअर्स 11 जुलै 2003 रोजी फक्त 3.43 रुपयांना होते. यानंतर, 20 वर्षात यात 11795 टक्क्यांची वाढ होत तो 408 रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे प्राजच्या शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 461.50 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता. यानंतर, शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसला आणि 28 मार्च 2023 रोजी पाच महिन्यांत 35 टक्क्यांहून अधिक घसरून 299 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला.
आगामी काळात इथेनॉलची मागणी वाढणार असून त्याचा प्राजला फायदा होईल असा विश्वास तज्ज्ञांना आहे. काही काळापूर्वी, प्राज आणि इंडियन ऑइल यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत देशातील बॉयोफ्यूएल्स प्रोडक्शनची क्षमता मजबूत करण्याची योजना आहे.
या कराराबाबत इंडियन ऑइलने 2046 पर्यंत नेट-जीरो ऑपरेशनल एमिशन आणि ग्रीम एनर्जी डोमेममध्ये लीडरशीप कायम राखण्याचे उद्दीष्ट सफल करण्यास मदत मिळेल.
त्यामुळेच ब्रोकरेज फर्म ऍक्सिस सिक्युरिटीजने 500 रुपयांच्या टारगेटसह या गुंतवणूक करण्यासाठी बाय रेटिंग दिले आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.