आपला आयपीओ लॉन्च करायचा आहे. कंपनीने 3500 कोटी उभारण्यासाठी आयपीओचा मसुदा सेबीकडे सादर केला आहे. जागतिक खासगी इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकसचा अव्हान्स फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बहुसंख्य हिस्सा आहे. याशिवाय केदारा कॅपिटल, अबू धाबीची सॉवरेन इनवेस्टर मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनी, वर्ल्ड बँक शाखा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC), एवेंडस पीई इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स यांचे पैसेही कंपनीत गुंतले आहेत.
अव्हान्स फायनान्शिअल सर्व्हिसेस ही एजुकेशन फोकस्ड एनबीएफसी आहे, जी प्रत्येक पात्र भारतीय विद्यार्थ्याला हायपर-पर्सनलाइज्ड एज्युकेशन फायनान्सिंग सोल्यूशन्स देते. याशिवाय कंपनी भारतातील शैक्षणिक संस्थांची वाढ आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा देखील पूर्ण करते. अव्हान्सचा आयपीओ आल्यास, ती भारतातील लिस्टेड एज्युकेशन फोकस्ड NBFC असेल.
कंपनीने दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, आयपीओमध्ये 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. वॉरबर्ग पिंकस, केदारा कॅपिटल आणि आयएफसीकडून 2,500 कोटीची ओएफएसही (विक्रीची ऑफर) असेल. Avance भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा भांडवली आधार वाढवण्यासाठी आयपीओमधून मिळणारे उत्पन्न वापरेल. आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, नोमुरा, जेपी मॉर्गन, एव्हेंडस कॅपिटल, नुवामा आणि एसबीआय कॅपिटल या इनवेस्टमेंट बँका आहेत.
मार्च 2024 मध्ये कंपनीने विविध गुंतवणूकदारांकडून1000 कोटी निधी उभारला होता. या फंडिंग फेरीत सर्वात मोठी गुंतवणूक मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनीने केली आहे. मार्च 2019 मध्ये, वॉरबर्ग पिंकसने अव्हान्स फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 80 टक्के भागभांडवल घेण्यासाठी करार केला. 2013 मध्येच IFC कंपनीची भागधारक बनली. केदारा कॅपिटलने जानेवारी 2023 मध्ये फर्ममध्ये 800 कोटीची गुंतवणूक केली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.