EPACK Durable IPO Sakal
Share Market

IPO News: 19 जानेवारीला खुला होणार इपॅक ड्यूरेबलचा आयपीओ; कंपनी 'इतके' कोटी रुपये उभारणार

राहुल शेळके

EPACK Durable IPO: इपॅक ड्यूरेबलचा (Epack Durable) आयपीओ 19 जानेवारीला खुला होणार आहे. या आयपीओमध्ये 400 कोटींचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच, विद्यमान भागधारकांच्या वतीने 1.31 कोटी शेअर्स ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत ठेवले जातील.

कंपनीने मंगळवारी IPOची प्राइस बँड निश्चित केली आहे. त्याची किंमत 218 ते 230 रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी कमीत कमी 65 शेअर्स खरेदी करू शकतात. तर कमाल मर्यादा 13 लॉट म्हणजेच 845 शेअर्सवर निश्चित करण्यात आली आहे.

हा आयपीओ 23 जानेवारीला बंद होईल. 18 जानेवारीला एक दिवसासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अँकर बुक लॉन्च केले जाईल. इपॅक ड्यूरेबल ही भारतातील रूम एअर कंडिशनर्सची दुसरी सर्वात मोठी ओरिजिनल डिझाइन मॅन्युफॅक्चर कंपनी आहे.

इपॅक ड्यूरेबलमधील प्रमोटर्सची हिस्सेदारी 65.36 टक्के आहे आणि सार्वजनिक भागीदारी 34.64 टक्के आहे. ऍक्सिस कॅपिटल, डीएएम कॅपिटल ऍडव्हायजर्स आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे आयपीओसाठी मर्चंट बँकर आहेत.

इपॅक ड्यूरेबल आधी रूम एसीमध्ये वापर होणारे शीट मेटल, इंजेक्शन मोल्डेड, क्रॉस फ्लो फॅन आणि पीसीबीए सारखे विविध घटक तयार करायची. नंतर त्यांनी इंडक्शन कुकटॉप्स, मिक्सर-ग्राइंडर, वॉटर डिस्पेंसर डिझाइन करून आणि उत्पादन करून लहान गृहोपयोगी (एसडीए) मार्केटमध्ये प्रवेश केला.

ब्लू स्टार, डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया, व्होल्टास, हॅवेल्स इंडिया आणि हायर अप्लायन्सेस (इंडिया) हे रूम एअर कंडिशनर विभागातील इपॅक ड्यूरेबलचे ग्राहक आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Election : 'MIM सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष, सोलापुरातील 'या' मतदारसंघांत देणार उमेदवार'

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्सने Saurav Ganguly ला संचालक पदावरून हटवले

Latest Maharashtra News Updates : हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भाजप आमदार अनिल विज यांनी घेतली शपथ

Diwali Vatu Tips For Money: आर्थिक समस्यांने त्रस्त आहात? मग दिवाळीपूर्वीच करा 'ही' कामे, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

Manoj Jarange Patil: हाच तो ट्रॅप! जरांगेंनी बोलावलेल्या बैठकीला एससी, एसटी, मुस्लिम समाजाचे नेते; ''आता कुठलाही पक्ष असू द्या..''

SCROLL FOR NEXT