Exicom Tele Systems IPO: ईव्ही चार्जर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एक्सिकॉम टेली-सिस्टम्सचा (Exicom Tele-Systems) आयपीओ 27 फेब्रुवारी अर्थात आज खुला झाला आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. या आयपीओ अंतर्गत 429 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. 329 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. (Exicom Tele Systems IPO opens today GMP, review, subscription status, other details)
याशिवाय 100 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. आयपीओसाठीचा प्राईस बँड 135 रुपये ते 142 रुपये निश्चित करण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची जबरदस्त क्रेझ दिसून आली.
हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 154 रुपयांवर ट्रेड करताना दिसला. कंपनीचे शेअर्स 296 रुपयांवर लिस्ट होतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
एक्सिकॉम टेली-सिस्टम्समध्ये नेक्स्टवेव कम्युनिकेशंसची 76.55 टक्के, सॅटेलाइट फायनान्सची 4.64 टक्के आणि विंसन ब्रदर्सची 4.35 टक्के हिस्सेदारी आहे. एचएफसीएलची कंपनीत 7.74 टक्के हिस्सेदारी आहे. एक्सिकॉमच्या आगामी आयपीओमुळे या वर्षी एचएफसीएल स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल, युनिस्टोन कॅपिटल आणि सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. नेक्स्टवेव्ह कम्युनिकेशन्स आणि अनंत नाहाटा हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
एक्सिकॉम टेली-सिस्टम्स ही पॉवर मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रोवायडर आहे. हे दोन बिझनेस वर्टिकल अंतर्गत कार्यरत आहे. पहिला ईव्ही चार्जर बिझनेस आहे. ज्या अंतर्गत भारतात रेसिडेंशियल, बिझनेस आणि पब्लिक चार्जिंग वापरासाठी स्मार्ट चार्जिंग सिस्टम प्रोवाइड केले जातात.
दुसरा बिझनेस आहे पॉवर सोल्युशन्स बिझनेस, ज्यामध्ये ते भारत आणि परदेशात टेलीकम्युनिकेशन साइट्स आणि एनर्जी मॅनेजमेंट प्रदान करण्यासाठी डिजिटल इन्फ्रॉस्ट्रक्चर टेक्नोलॉजीचे डिझाईन, मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस देते.
ही कंपनी ईव्ही चार्जर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे. 31 मार्च 2023 पर्यंत रेसिडेंशियल आणि पब्लिक चार्जिंग सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअर 60 टक्के आणि 25 टक्के होता आणि भारतातील 400 ठिकाणी 35,000 हून अधिक ईव्ही चार्जर तैनात केले आहेत.
कंपनी भारतात तीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी चालवते, ज्यात हिमाचल प्रदेशमधील सोलन फॅसिलिटी, हरयाणातील गुरुग्राम फॅसिलिटी I आणि गुरुग्राम फॅसिलिटी II चा समावेश आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.