स्मॉलकॅप स्टॉक फिनोटेक्स केमिकलने (Fineotex Chemical) त्याच्या शेयरहोल्डर्ससाठी 60 टक्के डिव्हिडंड जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 1.20 रुपये डिव्हिडंड जारी केला जाईल. दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी 3 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या हा शेअर 407.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 4,517.55 कोटी झाले आहे. कंपनी त्यांच्या नफ्याचा वाटा डिव्हिडंडच्या स्वरूपात आपल्या शेयरहोल्डर्सना देते.
कंपनीने 60% अंतरिम डिव्हिडंड घोषित केल्याचे फिनोटेक्स केमिकलने एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले. म्हणजे एकूण 13.29 कोटी शेयरहोल्डर्सना 1.20 रुपये प्रति इक्विटी शेअर (2 रुपये फेस व्हॅल्यूवर) जारी केले जातील. या डिव्हिडंडसाठी शेयरहोल्डर्सची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड डेट 26 फेब्रुवारी आहे. त्याच वेळी डिव्हिडंड 12 मार्चला किंवा त्यापूर्वी दिला जाईल.
वार्षिक आधारावर, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा दुपटीने वाढून 27.7 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 13.6 कोटीचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल 67.21 कोटीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढून 107.9 कोटी झाला आहे. त्याच वेळी, कंपनीचा ऑपरेशनल EBITDA 34.5 कोटी होता.
फिनोटेक्स केमिकलच्या शेयरहोल्डर्सना गेल्या एका महिन्यात 21% परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यात 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 58 टक्के परतावा मिळाला आहे. याशिवाय, गेल्या 5 वर्षांत त्यात 1025 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 4 वर्षात 1530 टक्के बंपर नफा झाला आहे. एवढेच नाही तर गेल्या 10 वर्षात या शेअरने 14000 टक्के नफा दिला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.