FirstCry IPO Sakal
Share Market

Brainbee Solutions: पुण्यातील कंपनीने रतन टाटा आणि सचिन तेंडुलकरला केले मालामाल; गुंतवणूक 7 पटीने वाढली

FirstCry IPO: पुण्यातील ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड कंपनी जी FirstCry या ब्रँडच्या नावाखाली लहान मुलांचे कपडे आणि त्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करते त्या कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला.

राहुल शेळके

Brainbee Solutions: पुण्यातील ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड कंपनी जी FirstCry या ब्रँडच्या नावाखाली लहान मुलांचे कपडे आणि त्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करते त्या कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. आयपीओ नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर 651 रुपयांना लिस्ट झाला होता. कंपनीचा IPO 465 रुपयांच्या इश्यू किमतीच्या 40 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला.

FirstCry ची मूळ कंपनी Brainbee Solutions ने IPO द्वारे शेअर बाजारातून 4194 कोटी रुपये उभे केले आहेत. 1,666 कोटी रुपयांचा ताज्या इश्यू आणि 2528 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर होती. यासोबतच कंपनीचे मोठे गुंतवणूकदार सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यांनी मोठा नफा कमावला आहे.

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी 10 कोटींची गुंतवणूक

FirstCry IPO ची ग्रे मार्केट प्राईज (GMP) लक्षात घेता, तो सुमारे 20 टक्के प्रीमियमवर लिस्ट होणे अपेक्षित होते. पण, दलाल स्ट्रीटवरच्या यादीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या IPO मधून सचिन तेंडुलकरला अंदाजे 3.35 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीत 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी 487.44 रुपयांना 2 लाखांहून अधिक शेअर्स घेतले होते. आता लिस्टिंग किंमतीनुसार त्यांची गुंतवणूक 13.35 कोटी रुपये झाली आहे.

रतन टाटांची 66 लाखांची गुंतवणूक 5 कोटी झाली

अनुभवी गुंतवणूकदार रतन टाटा यांनी 2016 मध्ये कंपनीचे 77,900 इक्विटी शेअर्स 84.72 रुपये दराने खरेदी केले होते. फर्स्टक्रायमध्ये त्यांनी 66 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

कंपीनीचा व्यवसाय काय?

ब्रेनबीज सोल्युशन्स कंपनी 2010 मध्ये स्थापन झाली. फर्स्टक्राय या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लहान मुले यांच्याशी संबंधित उत्पादने विकतात. कंपनीच्या आर्थिक आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, गेल्या तीन आर्थिक वर्षांपासून कंपनी सातत्याने तोट्यात आहे, परंतु महसुलात सातत्याने वाढ होत आहे.

2022 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ तोटा 78.69 कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढून 486.06 कोटी रुपये झाला. पुढील आर्थिक वर्ष 2024 मध्ये तोटा थोडा कमी झाला आणि तो 321.51 कोटी रुपयांवर आला. या कालावधीत, कंपनीचा महसूल वार्षिक 61 टक्क्यांहून CAGR वाढून 6,575.08 कोटी रुपये झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT