Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: 'या' लॉजिस्टिक शेअरमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल, 37 पैशाच्या शेअरने बनवले कोट्याधीश

सध्या हा शेअर 97.73 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीची मार्केट कॅप 70.37 कोटी रुपये आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock: लॉजिस्टिक कंपनी फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकचा (Flomic Global Logistics) स्टॉक लाँग टर्मसाठी अतिशय लकी ठरलाय.

केवळ 38 हजारांच्या गुंतवणुकीवर या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कोट्याधीश केले आहे. सध्या हा शेअर 97.73 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीची मार्केट कॅप 70.37 कोटी रुपये आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकचे शेअर्स 23 मार्च 2020 रोजी फक्त 37 पैशांवर होते. यानंतर केवळ तीन वर्षांत 26314 टक्क्यांनी वाढून ते 97.73 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदार केवळ 38 हजारांची गुंतवणूक करून कोट्याधीश झाले.

गेल्या वर्षी 7 मार्च 2022 रोजी तो 181.90 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होता. पण मागच्या सहा महिन्यांत हा शेअर जवळपास 61 टक्क्यांनी घसरून 16 मार्च 2023 रोजी 71.60 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला. पण आता या शेअरमध्ये 36 टक्क्यांनी रिकव्हरी झाली आहे.

जानेवारी-मार्च 2023 मध्ये तिमाही आधारावर तिचा निव्वळ नफा 1.12 कोटी रुपयांवरून 87 लाख रुपयांपर्यंत घसरला. या कालावधीत महसूल 82.94 कोटी रुपयांवरून 75.22 कोटी रुपयांवर आला आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक ही लॉजिस्टिक कंपनी आहे. ही कंपनी वेअरहाउसिंग, डिस्ट्रीब्युशन, फ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम ब्रोकिंग कार्गो, कंसोलिडेशन, मल्टीमॉडम ट्रान्सपोर्टेशन आणि कंट्री ट्रेड सर्व्हिसेज देते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT