share marketing latest sakal
Share Market

Stock Market Today: निफ्टी 50, सेन्सेक्स वाढीसह बंद; गुंतवणूकदारांना 2 लाख कोटी रुपयांचा फायदा

आज दिवसअखेर शेअर मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीतील वाढीसह बंद झाला. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे दोन दिवस शेअर मार्केटमधे नुकसान पाहिल्यानंतर मंगळवारी काही प्रमाणात गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आज दिवसअखेर शेअर मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीतील वाढीसह बंद झाला. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे दोन दिवस शेअर मार्केटमधे नुकसान पाहिल्यानंतर मंगळवारी काही प्रमाणात गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. निफ्टी ९५ पॉईन्ट्स किंवा ०.४८ टक्क्यांनी वाढून १९,८८९.७० वर बंद झाला, तर सेन्सेक्स २०४ पॉईन्ट्स किंवा ०,३१ टक्क्यांच्या वाढीसह ६६,१७४ वर बंद झाला. (Frontline indices the Sensex and the Nifty 50 ended with gains on Tuesday November)

भारताचे दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी गुरुवारी जाहीर होणार आहे. तज्त्रांच्या दाव्यानुसार भारताचा दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी ६.८ ते ७.१ टक्के नोंदली जाईल. पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपीपेक्षा तो कमी असेल. पुढील आठवड्यात जागतिक अर्थव्यवस्थांची माहिती जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सावधगिरी पाहायला मिळणार आहे.

मीड आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज हिरव्या रंगांमध्ये बंद झाले. BSE मीडकॅप निर्देशांक ०.३० टक्क्यांनी वाढला तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.०६ टक्क्यांनी वाढला. एकंदरीत बीएसईमध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे भागभांडवल ३३१.१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. यामुळे गुंतवणुकदारांना एका सेशनमध्ये तब्बल २.४ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

बीएसईच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ३०० शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली. भारतीय एअरटेल, एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि टायटनच्या शेअर्गसंनी ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. निफ्टी ५० मध्ये अदानी एन्टरप्राईज, अदानी पोर्ट, टाटा मोटर्स यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

सीपला, अपोलो हॉस्पिटल, हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये घसरण झाली. दुसरीकडे, हेल्थकेअर, फार्मा आणि एफएमसीजी या सेक्टरमधील शेअरच्या किमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली. निफ्टी ५० मधील ३९ शेअर्स हिरव्या रंगात आणि ११ शेअर्स लाल रंगात बंद झाले.दरम्यान, ओपेकची बैठक नुकतीच पार पडली आहे. येत्या काळात तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT