Gautam Adani and Mukesh Ambani net worth fall amid Stock Market Crash  Sakal
Share Market

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळल्यानंतर अदानींचे 90,000 कोटी तर अंबानींचे 30,000 कोटी बुडाले

Stock Market Crash: शेअर बाजार बुधवारी कोसळला. मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे बाजारातील घसरणीच्या काळात बड्या कंपन्यांचे शेअर्स पत्याच्या घराप्रमाणे कोसळले आणि या कंपन्यांच्या मालकांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली.

राहुल शेळके

Stock Market Crash: शेअर बाजार बुधवारी कोसळला. मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे बाजारातील घसरणीच्या काळात बड्या कंपन्यांचे शेअर्स पत्याच्या घराप्रमाणे कोसळले आणि या कंपन्यांच्या मालकांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. (Gautam Adani and Mukesh Ambani net worth fall amid Stock Market Crash)

एकीकडे अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना 90 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले, तर दुसरीकडे देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 30 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानी समूहाचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी घसरले

बुधवारी शेअर बाजारात झालेल्या विक्रीमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि कंपन्यांचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी घसरले. गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 13 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूजर होता. तो 1650 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशनच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची घसरण झाली. यासोबतच गौतम अदानी समूहाच्या अदानी पॉवर, अदानी विल्मार, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

अंबानींची संपत्ती झाली कमी

फोर्ब्सच्या अहवालानुसार, बुधवारी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी 4.42 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 30,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. रिलायन्सचे बाजारमूल्य 19.39 लाख कोटी रुपयांवर घसरले. रिलायन्सच्या शेअर्सच्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती 112.5 अब्ज डॉलरवर घसरली.

गुंतवणूकदारांचे 13.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बुधवारचा दिवस वाईट होता. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 1046 अंकांनी घसरला, तर निफ्टी 388 अंकांनी घसरला. शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटच्या मिनिटांत बाजारात थोडीशी रिकव्हरी झाली.

परंतु असे असतानाही सेन्सेक्स 906.07 अंकांनी घसरला आणि 72,761.89 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 338 अंकांनी घसरला आणि 21,997.70च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीदरम्यान शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे 13.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT