Gold vs Sensex Sakal
Share Market

Gold vs Sensex: सोने की शेअर बाजार? 15 वर्षांपासून दोन्हींमध्येही मोठी वाढ, जाणून घ्या कुठे गुंतवणूक करावी?

गेल्या 15 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सोने आणि शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 500 टक्के नफा मिळवून दिला आहे.

राहुल शेळके

Gold vs Sensex: सोने आणि शेअर्स या दोन्हीमधील गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत आहे आणि त्यासोबतच गुंतवणूकदारांना या दोन्हींमधून जोरदार परतावा मिळत आहे.

वार्षिक आधारावर दोन्हीच्या परताव्यात चढ-उतार होत असले, तरी गेल्या 15 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सोने आणि शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 500 टक्के नफा मिळवून दिला आहे.

अशा स्थितीत सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करणे योग्य आहे की शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर आहे? यापैकी कोणता पर्याय निवडणे शहाणपणाचे आहे. जाणून घेऊया

सोने आणि सेन्सेक्समधून गेल्या 17 वर्षांत या दोघांनीही आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांपर्यंत नफा दिला आहे. 2006 मध्ये, जिथे सोन्याचा भाव 10,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

त्यानंतर वर्षानुवर्षे तो वाढतच गेला आणि आता सोन्याचा भाव 61,500 रुपयांवर पोहोचला आहे, सेन्सेक्सही 63,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. म्हणजेच या काळात दोघांनी 60,000 पार केले आहेत.

2006 नंतर, सेन्सेक्सच्या वाटचालीत मोठे बदल आणि चढ-उतार दिसून आले, सोन्याचे भावही सतत वाढत आणि घसरत राहिले. मात्र, आता दोघांची पातळी जवळपास सारखीच आहे.

या प्रकरणात, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन्हीमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर या कालावधीत ते सुमारे 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक झाले असते.:

सेन्सेक्स आणि सोन्याच्या गुंतवणुकीतील फरक:

सेन्सेक्स आणि सोन्यात गुंतवणूक करण्यात काय फरक आहे आणि कोणती गुंतवणूक जास्त जोखमीची आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर देशातील मोठ्या कंपन्या सूचीबद्ध आहेत.

हा 30 शेअर्सचा निर्देशांक आहे, जो प्रत्येक ट्रेडिंग दिवशी अपडेट होतो. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम जास्त असते, कारण एखाद्या शेअरला तेजी मिळाली, तर गुंतवणूकदारांचे पैसे क्षणार्धात दुप्पट-तिप्पट होतात, तर शेअर घसरल्यास त्यांची गुंतवणूकही त्याच वेगाने कमी होते.

दुसरीकडे, परंपरेने सोने हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम आणि सुरक्षित प्रकार मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. देशातील सोन्याबद्दलच्या समजुतींचाही या वापरात मोठा वाटा आहे.

तज्ञ काय म्हणतात?

शेअर बाजार आणि सोने बाजार तज्ञ अनुज गुप्ता (CEO, IIFL सिक्युरिटीज) यांच्या मते, नवीन गुंतवणूकदारांच्या प्रवेशामुळे कोविडमध्ये सेन्सेक्सवर तेजीचा कल होता.

आता 10 कोटींहून अधिक खाती ठेवीदारांकडे आहेत, कोविडपूर्वी हा आकडा केवळ 4 कोटींपर्यंत मर्यादित होता. दुसरीकडे, महागाई आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात सोन्याची मागणी सातत्याने वाढली आहे.

तज्ञांच्या मते, सोने ही एक मृत संपत्ती आहे, जी तुम्हाला नियमित उत्पन्न देत नाही परंतु दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते. दुसरीकडे, BSE वर नोंदणीकृत सुमारे 5000 कंपन्यांमध्ये, तुम्ही वैयक्तिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवू शकता, पण यामध्ये जोखीम अधिक आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, सोने, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार, सोने किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT