Gopal Snacks Limited IPO sakal
Share Market

Gopal Snacks Limited IPO : गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा आयपीओ 6 मार्च ते 11 मार्चपर्यंत खुला, तुम्ही तयार आहात का ?

गोपाल स्नॅक्स लिमिटेड (Gopal Snacks ltd) या स्नॅक्स बनवणाऱ्या कंपनीचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 6 ते 11 मार्चदरम्यान गुंतवणुकदारांना बोली लावता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

गोपाल स्नॅक्स लिमिटेड (Gopal Snacks ltd) या स्नॅक्स बनवणाऱ्या कंपनीचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 6 ते 11 मार्चदरम्यान गुंतवणुकदारांना बोली लावता येणार आहे. 650 कोटीच्या या आयपीओसाठी 381-401 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. गोपाल स्नॅक्स लिमिटेडच्या शेअर्सची लिस्टींग 14 मार्चला होईल. गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओ हा फक्त ऑफर फॉर सेल आयपीओ असेल. याचा अर्थ असा की कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत, फक्त प्रमोटर्सकडून शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. यामुळे ओएफएसमधून येणारा पैसा प्रमोटर्सकडे जाईल.

प्रमोटर गोपाल ॲग्रीप्रॉडक्ट्स आणि बिपिनभाई विठ्ठलभाई हदवानी ओएफएसमध्ये 520 कोटी आणि 80 कोटी किमतीचे इक्विटी शेअर्स विकतील. उर्वरित 50 कोटीचे शेअर्स हर्ष सुरेशकुमार शहा यांच्या वतीने विकले जाणार आहेत. प्रमोटर्सकडे कंपनीचे 93.5 टक्के शेअर्स आहेत. बाकी 6.5 टक्के हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे.

या शेअरहोल्डर्समध्ये ॲक्सिस ग्रोथ ॲव्हेन्यूज AIF-I आणि अशोका इंडिया इक्विटी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पीएलसी यांची प्रत्येकी 1.48 टक्के हिस्सेदारी आहे. इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस, ॲक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल या इश्यूसाठी मर्चंट बँकर म्हणून काम करतील. आयपीओमधील 50 टक्के क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी, 15 टक्के नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी आणि उर्वरित 35 टक्के रिटेल इनवेस्टर्ससाठी राखीव आहे. तसेच, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3.5 कोटीचे राखीव शेअर्स ठेवले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी राखीव भाग काढून टाकल्यानंतर, उरलेला इश्यू नेट इश्यू म्हणून विचारात घेतला जाईल.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एथनिक स्नॅक्स, वेस्टर्न स्नॅक्स आणि इतर उत्पादने ऑफर करते. ते गोपाल ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने विकते. कंपनीने 2023 या आर्थिक वर्षात 1,394.65 कोटीचा महसूल नोंदवला. या कालावधीत निव्वळ नफा 112.4 कोटी नोंदवला गेला. आर्थिक वर्ष 2024 च्या एप्रिल-सप्टेंबर दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 7 टक्क्यांनी वाढून 55.6 कोटी झाला आहे. तथापि, या कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल 3.3 टक्क्यांनी घसरून 676.2 कोटीवर आला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT