Adani Group Sakal
Share Market

Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका! 400 कोटींचा करार अडकला, काय आहे कारण?

राहुल शेळके

Adani Group: उद्योगपती गौतम अदानी हळूहळू विमान वाहतूक क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत. प्रथम 6 विमानतळांचे कामकाज ताब्यात घेण्यासाठी त्यांनी बोली जिंकली, नंतर मुंबई विमानतळ ताब्यात घेतले.

आता देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. कंपनीने एमआरओ व्यवसायात प्रवेश करण्यासाठी एअर वर्क्सचे अधिग्रहण करण्याची योजना आखली होती, परंतु आता त्यास विलंब होत आहे.

एअर वर्क्सच्या अधिग्रहणानंतर अदानी ग्रुपची टाटा ग्रुपसोबत या क्षेत्रात स्पर्धा होऊ शकते. याचे कारण म्हणजे टाटा समूह एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एईएसएल) खरेदी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

ही एअर इंडियाची उपकंपनी होती, जी खाजगीकरणाच्या वेळी वेगळी झाली होती. आता सरकार ती विकण्याची तयारी करत आहे.

शेवटची तारीख 2 वेळा चुकली :

अदानी समूहाने एअर वर्क्स खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. या सामंजस्य कराराची अंतिम मुदत दोनदा निघून गेली आहे. त्याची शेवटची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी-मार्च होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीजने एअर वर्क्सला 400 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. पण तो पूर्ण न होण्याचे कारण म्हणजे पुंज लॉयड ग्रुप.

पुंज लॉयड ग्रुप डील होण्यास विलंबाचे कारण:

सूत्रांचा हवाला देऊन, ET ने सांगितले आहे की पुंज लॉयड ग्रुपची एअर वर्क्समध्ये 23 टक्के भागीदारी आहे. सद्या पुंज लॉयड ग्रुप लिक्विडेशन म्हणजेच कंपनी बंद होण्याच्या परिस्थितीला तोंड देत आहे.

त्यामुळे एअर वर्क्सच्या मालमत्ताही बँकेच्या अखत्यारित असून त्यामुळे अदानी समूहाशी व्यवहार करण्यास वेळ लागत आहे.

मात्र, याबाबत अदानी ग्रुप, एअर वर्क्स आणि पुंज लॉयड ग्रुपकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. अदानी समूहाला एअर वर्क्सच्या माध्यमातून एमआरओ क्षेत्रात प्रवेश करायचा आहे.

विमानतळाच्या कामकाजासोबतच ड्युटी फ्री, ग्राउंड हँडलिंगचे काम सुरू करून कंपनीला आपला महसूल वाढवायचा आहे.

अदानी समूहाची टाटाशीं स्पर्धा :

एअर वर्क्स ही देशातील सर्वात जुनी खाजगी MRO कंपन्यांपैकी एक आहे. याची स्थापना 1951 मध्ये पी.एस. मेनन आणि बी.जी. मेनन नावाच्या दोन मित्रांनी केली होती. कंपनी देशातील 27 शहरांमध्ये सेवा देते. कंपनीचे मुंबई, होसर आणि कोची येथे हँगर्स आहेत.

सरकारी मालकीची एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी एमआरओ कंपनी आहे. 2021-22 मध्ये त्यांनी 450 विमाने हाताळली आणि तिचा नफा 840 कोटी रुपये होता.

ही कंपनी विकत घेण्यासाठी टाटा समूहाने जर्मनीच्या लुफ्थांसा आणि फ्रान्सच्या एअर फ्रान्स-केएलएम यांच्याशी करार करून समूहही स्थापन केला आहे. कंपनीचे 6 हँगर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT