Honasa Consumer Private Limited IPO Listing: ममाअर्थची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) 31 ऑक्टोबरला आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कंपनीची ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर सेगमेंटमध्ये काम करते. ही कंपनी 2022 मधील पहिली युनिकॉर्न होती.
डर्मा को., बी ब्लंट हे होनासा कंझ्युमरचे ब्रँड्स आहेत. कंपनीला यावर्षी ऑगस्टमध्ये स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली होती. कंपनीने आयपीओसाठी डिसेंबर 2022 मध्ये मसुदा कागदपत्रे दाखल केली होती.
अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 30 ऑक्टोबरपासून खुला होईल असा अंदाज आहे. प्री-आयपीओ राउंडसाठी अद्याप कोणतीही योजना नाही. कंपनीला नवीन शेअर्स आणि ऑफर-फॉर-सेलचा समावेश करून आयपीओमधून सुमारे 1,700 कोटी रुपये उभे करायचे आहेत.
सुमारे 10,500 कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनचे टारगेट आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल, सिटी आणि जेपी मॉर्गन या आयपीओवर काम करणाऱ्या इन्वेस्टमेंट बँका आहेत. सिरिल अमरचंद मंगलदास, इंडसलॉ आणि खेतान अँड कंपनी, कायदेशीर सल्लागार आहेत.
डीआरएचपीनुसार (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) होनासा कंझ्युमरचे भागधारक जे त्यांचे स्टेक कमी करतील त्यांच्यामध्ये अलग्स, सोफीना व्हेन्चर्स एस ए, इवॉल्वंस, फायरसाइड व्हेंचर्स, स्टेलारिस व्हेंचर पार्टनर्स, स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल, शिल्पा शेट्टी कुंद्रा, ऋषभ हर्ष शिवाय मारीवाला आणि रोहित कुमार बन्सल यांचा समावेश आहे. सेक्वॉइया कॅपिटल ओएफएसमध्ये सहभागी होणार नाहीत.
पती-पत्नी वरुण आणि गझल अलग यांनी 2016 मध्ये होनासा कंझ्युमर सुरू केले होते. सेक्वॉइया कॅपिटलच्या नेतृत्वाखाली 1.2 अब्ज डॉलरच्या व्हॅल्युएशनवर 5.2 कोटी डॉलर उभारल्यानंतर होनासा जानेवारी 2022 मध्ये कन्झ्युमर बनली.
होनासाने काही अधिग्रहण देखील केले, त्यापैकी पहिले मॉम्सप्रेसो होते. यानंतर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सकडून बीब्लंट आणि नंतर स्किनकेअर ब्रँड डॉ. शेठ विकत घेतले.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.