Hyundai India IPO Sakal
Share Market

Hyundai Motor India IPO: हुंडई मोटर इंडियाचा IPO 15 ऑक्टोबरला उघडणार; प्राइस बँड-लॉट साइजपासून ते GMP पर्यंत सर्व काही जाणून घ्या

Hyundai Motor India IPO: देशातील सर्वात मोठ्या IPO साठी आज शेवटचा दिवस उरला आहे. Hyundai Motor India चा IPO मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे आणि आजपासून तो अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.

राहुल शेळके

Hyundai Motor India IPO: देशातील सर्वात मोठ्या IPO साठी आज शेवटचा दिवस उरला आहे. Hyundai Motor India चा IPO मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे आणि आजपासून तो अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. ह्युंदाई ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

या IPO द्वारे 27,870 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे आणि या संदर्भात हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. मारुती सुझुकी इंडियानंतर Hyundai Motor India ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी आहे.

ग्रे मार्केट प्रीमियमची (GMP) स्थिती काय?

GMP च्या दृष्टिकोनातून, Hyundai Motor India IPO चे GMP 75 रुपये प्रति शेअर आहे. शेअर 2035 रुपये प्रति शेअर या दराने लिस्ट केला जाऊ शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत खुला असेल.

त्याची किंमत 1865 रुपये ते 1960 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. Hyundai Motor India च्या एका लॉटमध्ये सात शेअर्स असतील. हा संपूर्ण IPO ऑफर फॉर सेल (OFS) असेल. IPO नंतर कंपनीची हिस्सेदारी 100 टक्क्यांवरून 82.50 टक्क्यांवर येईल.

कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी 77,84,00 शेअर्स राखीव ठेवले आहेत आणि त्यांना प्रति शेअर 186 रुपये सूट दिली आहे. QIB साठी 50% पेक्षा जास्त शेअर्स, HNIs साठी 15% आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35% पेक्षा जास्त शेअर्स देण्यात येणार नाहीत.

OFS म्हणजे काय?

या IPO द्वारे जमा होणारा सर्व पैसा कंपनीच्या गुंतवणूकदारांना किंवा प्रवर्तकांना जाईल. Hyundai Motor India ची देशात 1377 विक्री केंद्रे आणि 1561 सेवा आउटलेट आहेत. कंपनीच्या IPO आधी, 2022 साली आलेला भारतीय आयुर्विमा निगम (LIC) चा 21,000 कोटी रुपयांचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT