Hyundai Motor IPO Live Updates: देशातील सर्वात मोठा IPO, Hyundai Motor India Ltdचा आजपासून खुला झाला आहे. Hyundaiचा ऑफर फॉर सेलद्वारे 27,856 कोटी निधी उभारण्याचा मानस आहे. दक्षिण कोरियाची जागतिक ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर त्यांच्या IPO दरम्यान 142 दशलक्ष इक्विटी शेअर्स विकणार आहे.
Hyundai Motor ही देशातील दुसरी सर्वात मोठी उत्पादक आणि प्रवासी वाहनांची सर्वात मोठी निर्यात करणारी कंपनी आहे. कंपनीने आपल्या इंडिया ग्रोथ स्ट्रॅटेजी अंतर्गत पुढील 8-10 वर्षात 32000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. कंपनीने IPO मध्ये 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या एका इक्विटी शेअरची किंमत 1865 ते 1960 रुपयांदरम्यान ठेवली आहे. कंपनीचे मूल्य सुमारे 1.5-1.6 लाख कोटी रुपये आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक इक्विटी शेअरवर 186 रुपयांची सूट देत आहे. BSE डेटानुसार Hyundai Motor India IPO ला आज सबस्क्रिप्शनच्या पहिल्या दिवशी सकाळी 11:09 वाजता 8% सबस्क्राइब केले गेले आहे.
Hyundai Motors चे व्यवस्थापकीय संचालक (MD) Unsoo Kim यांनी अलीकडेच सांगितले की, आम्ही या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आमच्या Creta EV सह प्रीमियम सेगमेंटमध्ये चार EV मॉडेल लॉन्च करण्याचा विचार करत आहोत. IPO 14 ऑक्टोबरपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा IPO 17 ऑक्टोबर रोजी बंद होईल. IPO ची लिस्टिंग 22 ऑक्टोबर रोजी NSE आणि BSE वर होईल.
ऑटो कंपनीने 225 अँकर गुंतवणूकदारांकडून 8,315 कोटी रुपये गोळा केले. पण जर आपण ग्रे म्हणजेच अनलिस्टेड मार्केटबद्दल बोललो तर हळूहळू त्याचा प्रीमियम खूपच कमी झाला आहे. Hyundai Motor India चा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 45 रुपये प्रति शेअर चालू आहे, याचा अर्थ गुंतवणूकदारांना फक्त 2.3 टक्के लिस्टिंग फायदा मिळू शकतो.
बहुतेक ब्रोकरेज हाऊसेसने या IPO ला 'सबस्क्राइब' रेटिंग दिले आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की, Hyundai Motor India चा IPO हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक मजबूत पर्याय आहे. दीर्घ मुदतीसाठी यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल.
काही काळापासून भारतातील ऑटो क्षेत्रात सुरू असलेल्या मंदीबाबत सतत चिंता व्यक्त केली जात आहे. एचएमआयचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) तरुण गर्ग यांनी सांगितले की, वाहनांच्या आकडेवारीनुसार, मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नोंदणीची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे.
मारुती सुझुकी नंतर Hyundai Motors India ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 2003 मध्ये लिस्ट झाल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी IPO लॉन्च करणारी ही पहिली ऑटो कंपनी आहे. LIC चा 21000 कोटींचा IPO 2022 मध्ये आला होता आणि आता Hyundai चे शेअर्स 27,856 कोटी रुपयांच्या शेअर ऑफरसह भारतातील सर्वात मोठा IPO बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.