Stock Market Sakal
Share Market

Stock Market: चीनच्या शेअर बाजारात विक्रमी वाढ! सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे फायद्याचे?

राहुल शेळके

Stock Market: भारताच्या शेअर बाजारात सलग 5 सत्रांमध्ये घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारांचे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर आहे. चीनचा शेअर बाजार शांघाय कंपोझिटमध्ये गेल्या 15 सत्रांमध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

चीन आणि हाँगकाँगच्या मार्केट कॅपमध्येही सुमारे 269 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय गुंतवणूकदारही या तेजीचा फायदा घेऊ शकतात. तुम्हालाही चिनी बाजारात गुंतवणूक करायची आहे का? करायची असेल तर पर्याय काय आहेत ते जाणून घेऊया.

याआधी, चिनी शेअर बाजारात एवढी वाढ का झाली आहे हे जाणून घ्या. चीन सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले आहे.

याचा थेट फायदा शेअर बाजाराला झाला आणि केवळ 15 सत्रांमध्ये शांघाय कंपोझिट आणि हँग सेंगच्या बाजार भांडवलात 269 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सध्या चिनी बाजारपेठेत दीर्घकालीन गुंतवणूक करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तज्ञ काय म्हणतात?

एडलवाइजच्या सीईओ राधिका गुप्ता म्हणाल्या की, कोविडनंतर पहिल्यांदाच चीनच्या अर्थव्यवस्थेत एवढी सुधारणा दिसून येत आहे. चीनच्या शेअर बाजाराचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे येथील गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत मोठ्या परताव्याची अपेक्षा करतात. आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीझ म्हणतात की, भारतीय गुंतवणूकदारांनी चीनी बाजाराचा फायदा घेण्यासाठी म्युच्युअल फंडातून जाणे योग्य ठरेल.

कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी?

दोन्ही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी बाजारातून प्रचंड नफा मिळविण्यासाठी भारतीय गुंतवणूकदारांनी 4 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अलीकडील सुधारणांमुळे विमा क्षेत्र खूप वेगाने वाढणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने आणि त्याचे घटक उत्पादन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्येही गुंतवणूक करू शकतात.

सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वाधिक मदत केली आहे. त्यामुळे संबंधित कंपन्या चांगला रिटर्न देऊ शकतात. राधिका गुप्ता सांगतात की, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात सुधारणा होत असली तरी दीर्घकालीन अनिश्चितता आहे. त्यामुळे पैसे गुंतवताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

गुंतवणुकीचे मार्ग काय आहेत?

चीनमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे अमेरिकन बाजारात पैसे गुंतवण्यासारखेच आहे. यासाठी तुम्हाला परदेशी बाजारात गुंतवणूक करणारा ब्रोकर शोधावा लागेल. काही ब्रोकर आहेत जे तुम्हाला थेट चीनच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये पैसे गुंतवण्याची परवानगी देतात.

याशिवाय तुम्ही एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) द्वारे चीनी शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता. हे देखील एक सुरक्षित साधन असेल. अनेक चिनी शेअर्स आहेत जे अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट आहेत आणि तुम्ही तिथूनही गुंतवणूक करू शकता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

SCROLL FOR NEXT