Indian Stock Market Crash Sakal
Share Market

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

राहुल शेळके

Indian Stock Market Crash: गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारातील घसरणीशी चीनचा संबंध आहे का? एकाच दिवसात सेन्सेक्स 1770 अंकांनी तर निफ्टी 550 अंकांनी घसरला आहे. या घसरणीत सर्वात मोठा वाटा परदेशी गुंतवणूकदारांचा आहे ज्यांनी एकाच दिवसात 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत असलेल्या भारतीय बाजाराऐवजी परदेशी गुंतवणूकदार चिनी शेअर बाजाराकडे वळतील, अशी भीती त्यांना वाटत होती.

परदेशी गुंतवणूकदार चीनकडे का वळत आहेत?

गेल्या आठवड्यात, चीन सरकारने अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि 5 टक्क्यांपर्यंत आर्थिक विकास दर गाठण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्याच वेळी, 1.4 ट्रिलियन डॉलर्सचे मदत पॅकेजही जाहीर केले जाऊ शकते असा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, यामुळे चिनी शेअर बाजारातील शेअर्समध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदार चीनकडे वळू शकतात. गेल्या एका आठवड्यात चिनी शेअर बाजार 15 टक्क्यांनी वाढला आहे. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदार चांगल्या परताव्याच्या दृष्टीने चीनच्या शेअर बाजारात आपली गुंतवणूक वाढवू शकतात.

भारतीय शेअर बाजार चिंतेत

गेल्या आठवड्यात चिनी शेअर बाजारातील वाढीमुळे चीन पुन्हा पुढे सरसावला आहे. मात्र, चीनच्या शेअर बाजारातील वाढीचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे गावकल रिसर्चने आपल्या अहवालात म्हटले आहे.

बुलची तेजी कायम राहणार का?

गवेकल रिसर्चच्या अहवालानुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर उदयोन्मुख बाजारपेठांमधील भांडवलाचा प्रवाह वाढेल. आंतरराष्ट्रीय निर्देशांकात भारताचे वेटेज वाढल्यामुळे गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे.

अहवालानुसार, चीनचा शेअर बाजार वाढत राहिला तरीही अनेक परदेशी गुंतवणूकदार चिनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून दूर राहतील. चीनची जागतिक डोकेदुखी भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे.

अहवालानुसार, परदेशी गुंतवणूकदारांना इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चांगली तेजी दिसत आहे परंतु भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली तेजी संपेल की नाही हे सांगणे फार कठीण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2024: पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; फडणवीसांची माहिती

Harshvardhan Patil Tutari: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

Bigg Boss 18 : नव्वदच्या दशकातील सेन्सेशनल स्टार शिल्पा शिरोडकर दिसणार बिग बॉसच्या घरात ; "सलमानबरोबर काम करण्याचं स्वप्न"

Mumbai Indians कडून १८ कोटी मिळावे, एवढी हार्दिक पांड्याची पात्रता आहे का? वाचा कोणी केलं हे विधान...

Latest Marathi News Updates : तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT