Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय इक्विटी इंडेक्स शुक्रवारी सलग पाचव्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. निफ्टी 25,050 च्या आसपास राहिला. त्याचवेळी सेन्सेक्स 809 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 808.65 अंकांनी अर्थात 0.98 टक्क्यांनी घसरून 81,688.45 वर बंद झाला आणि निफ्टी 200.30 अंकांनी अर्थात 0.79 टक्क्यांनी घसरून 25,049.80 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनि सांगितले की, बाजार शुक्रवारीही दबावाखाली राहिला. बाजाराने एक टक्क्याहून अधिक घसरणीसह करेक्शनच्या टप्प्यात प्रवेश केला. सध्याच्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

त्यामुळे आगामी धोरणात्मक बैठकीत आरबीआयकडून दर कपातीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने बाजारावर दबाव वाढत आहे. अलीकडील घसरणीनंतर थोडा विराम किंवा किंचित उसळी आली असली तरी निफ्टी 25,600 ची पातळी परत मिळवेपर्यंत बाजाराचा एकूण कल नकारात्मक राहील.

आयटी, मेटल आणि फार्मा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ताकद दिसून येत आहे, तर इतर क्षेत्रातील वाढीमुळे विक्रीचा दबाव दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी त्यांची स्थिती त्यानुसार एडजस्ट करावी आणि कोणतेही संभाव्य धोके टाळण्यासाठी हेजिंग धोरणासह व्यापार करावा.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT

  • नेस्ले इंडिया (NESTLEIND)

  • बीपीसीएल (BPCL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • हिंदुस्तान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • वोल्टास(VOLTAS)

  • एमआरएफ (MRF)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी! जयंत पाटलांनी केली घोषणा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला; तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

Senior Citizens Care Tips: साठ वर्षानंतर 'या' टेस्ट करूनच घ्या, वाढत्या वयात आजारांपासून होईल बचाव

SCROLL FOR NEXT