Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातून होईल मोठी कमाई; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Today: शुक्रवारी ब्रॉडर इंडेक्सने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.फेडने व्याजदरात अपेक्षित कपात केल्यानंतर बेंचमार्क सेन्सेक्स-निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. या आठवड्यात ब्रॉड इंडेक्सने नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी ब्रॉडर इंडेक्सने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.फेडने व्याजदरात अपेक्षित कपात केल्यानंतर बेंचमार्क सेन्सेक्स-निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. या आठवड्यात ब्रॉड इंडेक्सने नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 84,694.46 आणि 25,849.25 च्या नवीन उच्चांकांवर पोहोचले. सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी रिॲल्टी इंडेक्स 4.5 टक्क्यांनी, निफ्टी बँक इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची वाढ दिसून आली.

निफ्टी ऑटो इंडेक्स 2 टक्क्यांनी वाढला. तर, निफ्टी एफएमसीजी इंडेक्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली , पण, निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे 3 टक्क्यांनी घसरला, निफ्टी मीडिया इंडेक्स 2.6 टक्क्यांनी घसरला आणि निफ्टी फार्मा इंडेक्स 2 टक्क्यांनी घसरला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

जोपर्यंत बाजार 25500/82700 च्या वर व्यवहार करत आहे तोपर्यंत ब्रेकआउट टेक्सचर चालू राहण्याची शक्यता असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. वरच्या बाजूने, बाजार 26000-26200/85000-85500 पर्यंत वाढू शकतो.

दुसरीकडे, 25500/82700 च्या खाली घसरल्यास भावना बदलू शकते. ते याच्या खाली गेल्यास, व्यापारी लॉन्ग पोझिशन ट्रेडिंगमधून बाहेर पडण्यास प्राधान्य देऊ शकतात.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एल अँड टी (LT)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL )

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT