Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी भारतीय इक्विटी इंडेक्समध्ये तेजी दिसून आली आणि निफ्टी 25,400 च्या आसपास राहिला. बँका, एफएमसीजी आणि रिॲल्टी कंपन्यांमध्ये वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 236.57 अंकांनी अर्थात 0.29 टक्क्यांनी वाढून 83,184.80 वर आणि निफ्टी 38.25 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून 25,415.80 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

भारतीय इक्विटींनी FOMC द्वारे 50bps दर कपातीचे स्वागत करून 25,500 च्या नव्या उच्चांकावर विकली एक्स्पायरी दिवसाची सुरुवात केल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

पण पुन्हा एकदा ब्रॉड मार्केटने बाजाराच्या भावनेवर परिणाम केला आणि मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे इंडेक्स घसरला. पण, निफ्टी 38.25 अंकांच्या वाढीसह 25,415.80 वर बंद झाला.

वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, FMCG सर्वात वेगाने वाढला. त्यानंतर बँक निफ्टी आणि रियल्टी यांचा क्रमांक लागतो, तर मीडिया आणि पीएसयू बँकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. मिड आणि स्मॉलकॅप 0.67 टक्के आणि 1.26 टक्क्यांनी घसरले आणि निफ्टीची कामगिरी कमी झाली.

निफ्टीने आरएसआयमध्ये संभाव्य बियरिश डायवर्जंससह रेकॉर्ड स्तरावर शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. इंडेक्सची कंसोलिडेशन रेंज 25,300-25,500 आहे आणि या रेंजच्या दोन्ही बाजूला ब्रेकआऊट बाजाराला स्पष्ट दिशा देईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एनटीपीसी (NTPC)

  • टायटन (TITAN )

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • ए यू बँक (AUBANK)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : शुभम जोशी यांची श्री साई संस्थान शिर्डी येथे मुख्य प्रधान पुजारी म्हणून निवड

SCROLL FOR NEXT