Share Market Investment Tips: मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी चढ-उतारांच्या दरम्यान वाढीसह बंद झाले. निफ्टी 21,550 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 30.99 अंकांच्या अर्थात 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 71,386.21 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 31.80 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून 21,544.80 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
मजबूत जागतिक संकेतांसह भारतीय इक्विटी बाजार तेजीत उघडल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी इंडेक्समध्ये वाढ दिसून आली, पण बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने निफ्टी 31.85 अंकांच्या किंचित वाढीसह 21,544.85 वर बंद झाला.
रिऍल्टी सेक्टर 2.52 टक्के वाढीसह सर्वात वेगाने वाढणारे सेक्टर राहिले. त्यानंतर फार्मा आणि ऑटोमध्येही वाढ दिसून आली. दुसरीकडे, मीडिया इंडेक्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
बँक निफ्टी आणि पीएसयू बँकिंग सेक्टरही लाल रंगात बंद झाले. निफ्टी 21,500-21,800 च्या रेंजमध्ये फिरत असल्याचे दिसते. या रेंजच्या कोणत्याही दिशेला ब्रेकआउट झाल्यास बाजाराची दिशा स्पष्ट होईल.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
एसबीआय लाइफ (SBILIFE)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.