Share Market Investment Tips: शेअर बाजारात बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स सलग चौथ्या सत्रात घसरणीसह बंद झाले. निफ्टी 24,450 च्या खाली राहिला. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरल्याचे दिसून आले. पण मिड आणि स्मॉल कॅपची चमक कायम राहिली. बाजार बंद असताना सेन्सेक्स 280.16 अंकांनी अर्थात 0.35 टक्क्यांनी घसरून 80,148.88 वर बंद झाला. निफ्टी 65.50 अंकांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी घसरून 24,413.50 वर बंद झाला.
बाजारात संमिश्र कल दिसून आल्याचे प्रोग्रेसिव शेअर्सचे आदित्य गग्गर म्हणाले. सकाळी मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये वाढ दिसून आली. तर बँक निफ्टीमधील शेअर्सच्या घसरणीमुळे निफ्टीमध्ये 65.55 अंकांची घसरण झाली आणि तो 24,413.50 पर्यंत घसरला आणि एनर्जी सेक्टरनंतर मीडिया इंडेक्सला सर्वात जास्त फायदा झाला. तर प्रॉफीट बुकिंगमुळे एफएमसीजी सेक्टरमध्ये घसरण झाली.
दैनिक चार्टवर इंडेक्सने एक स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केल्याचे आदित्य पुढे म्हणाले. हा पॅटर्न बुल्स आणि बेअर्स यांच्यातील अनिश्चितता दर्शवतो. 24,200 लेव्हलवर इंडेक्सला सपोर्ट राहील. तर 24,560 च्या लेव्हलवर रझिस्टंस दिसून येत आहे.
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
ब्रिटानिया (BRITANNIA)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
एम फॅसिस (MPHASIS)
ऍस्ट्रल (ASTRAL)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.