Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कसा असेल शेअर बाजार? कोणते शेअर्स असतील तेजीत?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सपाट बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 109.08 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 80,039.80 वर बंद झाला आणि निफ्टी 7.40 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरून 24,406.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमजोर जागतिक संकेतांदरम्यान भारतीय बाजारांची सुरुवात मंथली एक्सपायरी दिवशी 150 हून अधिक अंकांच्या घसरणीने झाली. पण, मोठ्या घसरणीनंतर, दिवसभर तीव्र रिकव्हरीही दिसून आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

यामुळे निफ्टीला सपोर्ट मिळाला आणि त्याचा तोटा केवळ 7.40 अंकांपर्यंत मर्यादित राहिला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टी 24,406.10 वर बंद झाला.

वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल बोलायचे झाले तर, ऑटोमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. त्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये वाढ दिसून आली. तर सर्वात मोठी घसरण मेटल आणि रियल्टीमध्ये दिसून आली. मिड आणि स्मॉल कॅप त्यांच्या सकाळच्या नीचांकीवरून सावरले.

निफ्टीला 24,200 वर मजबूत सपोर्ट असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत इंडेक्स हा सपोर्ट कायम ठेवतो तोपर्यंत अपट्रेंड चालू राहील. दुसरीकडे, निफ्टीला 24560 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • टायटन (TITAN)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • ए यू बँक (AUBANK)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • आयडिया (IDEA)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT