Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: अमेरिकेचा जीडीपी घसरला; भारतीय बाजारांवर परिणाम होणार का?

Share Market Investment Tips: गुरुवारी अर्थात एप्रिल एक्स्पायरीदिवशी बाजारात दमदार तेजीची अॅक्शन पाहायला मिळाली. सेन्सेक्स, निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): गुरुवारी अर्थात एप्रिल एक्स्पायरीदिवशी बाजारात दमदार तेजीची अॅक्शन पाहायला मिळाली. सेन्सेक्स, निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. फार्मा, पीएसई आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

त्याच वेळी, मेटल आणि एनर्जी इंडेक्सही वाढीसह बंद झाले. एफएमसीजी आणि इन्फ्रा शेअर्समध्येही खरेदी झाली. पीएसयू बँक इंडेक्स सुमारे 4 टक्क्यांनी वाढला. मात्र, कंझ्युमर ड्यूरेबल इंडेक्स घसरणीसह बंद झाला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 74,339 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 168 अंकांनी वाढला आणि 22,570 वर बंद झाला. बँक निफ्टी 306 अंकांनी वाढून 48,495 वर बंद झाला. तर मिडकॅप 237 अंकांनी वाढून 50,229 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये गुरुवारी अस्थिर व्यवहार दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. आवर्ली मोमेंटम पॉझिटीव्ह सकारात्मक क्रॉसओव्हर सुरू केला आहे जो खरेदीचा सिग्नल आहे. पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजार वाढत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वरच्या बाजूला 22,776 वर रझिस्टंस दिसत आहे. लाँग पोझिशन्ससाठी स्टॉप-लॉस 22,430 या स्तरावर असावा जो 20-आवर मूव्हिंग एव्हरेज आहे.

बँक निफ्टीमध्ये स्मार्ट रिकव्हरी दिसून आली. जवळपास 400 अंकांनी घसरल्यानंतर तो अखेर 300 अंकांच्या वाढीसह बंद झाला. येत्या काळातही ही तेजी कायम राहील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले. कोणतीही किरकोळ घसरण खरेदीची संधी म्हणून पाहावी असेही ते म्हणाले. वरच्या बाजूला, यासाठी 49,000 वर रझिस्टंस दिसत आहे. तर 48,200 च्या ट्रेलिंग स्टॉपलॉससह लाँग पोझिशन राखायचा सल्ला त्यांनी दिला जी 20 आवर मूव्हिंग एव्हरेज आहे.

गिफ्ट निफ्टी वाढीसह 22650 च्या वर व्यवहार करत आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील थोड्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर बँक ऑफ जपानच्या धोरणावर आशियाई बाजारांची नजर असणार आहे. 25 एप्रिल रोजी अमेरिकेने मार्च तिमाहीसाठी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, 2024 च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेचा आर्थिक विकास दर वार्षिक आधारावर 1.6 टक्के राहिला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तुलनेत जीडीपीचीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अॅक्सिस बँक (AXISBANK)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • हिरो मोटोकॉर्प लिमिटेड (HEROMOTOCO)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • आयडीया (IDEA)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT