Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: कमाईची संधी! इंट्राडेमध्ये 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात कंसोलिडेशन दिसून आले. सेन्सेक्स-निफ्टी नेगिटिव्ह ट्रेंडसह फ्लॅट बंद झाले. शुक्रवारी मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग, एफएमसीजी आणि पीएसई शेअर्स दबावाखाली राहिले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips In Marathi: शुक्रवारी बाजारात कंसोलिडेशन दिसून आले. सेन्सेक्स-निफ्टी नेगिटिव्ह ट्रेंडसह फ्लॅट बंद झाले. शुक्रवारी मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग, एफएमसीजी आणि पीएसई शेअर्स दबावाखाली राहिले.

व्यवहाराच्या शेवटी, सेनेक्स 15.44 अंकांच्या अर्थात 0.02 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 73,142.80 वर बंद झाला आणि निफ्टी 4.75 अंकांच्या म्हणजेच 0.02 टक्क्यांच्या घसरणीसह 22,212.70 वर बंद झाला. (Investment Tips in marathi Which 10 shares perform today BPCL HCLTECH MARUTI 26 February 2024)

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारी निफ्टी वाढीसह उघडला पण सकाळचा वेग पुढे राखण्यात अपयशी ठरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. प्रॉफिट बुकींगमुळे दिवसाच्या नीचांकावर बंद झाला.

निफ्टी 22,200 च्या महत्त्वाच्या रझिस्टंस लेव्हलवरवर बंद झाल्याने शॉर्ट टर्मसाठी मार्केटमधली भावना सकारात्मक दिसत आहे. आता त्याचा पुढील रझिस्टंस 22,400 वर आहे. निफ्टीला 21,900 वर सपोर्ट आहे. जोपर्यंत निफ्टी 21,900 च्या वर राहील तोपर्यंत घसरणीवर खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

निफ्टी वाढीसह उघडला आणि दिवसअखेर 4 अंकांच्या किंचित घसरणीसह लाल रंगात बंद झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली चार्टवरील शेवटच्या ट्रेडिंग सत्रातील मजबूत वाढीनंतर, निफ्टी वरच्या स्तरावर वाढताना दिसला.

22,130 - 22,090 च्या सपोर्ट झोनकडे होणारी कोणतीही घसरण ही खरेदीचा संधी म्हणून विचार करा असेही ते म्हणाले. बाजाराचा एकूण ट्रेंड अजूनही सकारात्मक आहे. निफ्टीसाठी 22,300 - 22,350 वर रझिस्टंस दिसतो आणि 22,130 - 22,090 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • मारुती (MARUTI)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ऍबॉट इंडिया लिमिटेड (ABBOTINDIA)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • पीएफसी (PFC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT