Share Market Investment Tips In Marathi: काल शेअर बाजारातील तेजीला अखेर ब्रेक लागला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 434.31 अंकांनी अर्थात 0.59 टक्क्यांनी घसरून 72,623.09 वर आणि निफ्टी 142.00 अंकांनी म्हणजेच 0.64 टक्क्यांनी घसरून 22,055.00 वर आला. (Investment Tips in marathi Which 10 shares perform today 22 February 2024)
निफ्टीने डेली चार्टवर बियरिश पॅटर्न तयार केल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय मंदीचा क्रॉसओव्हर दाखवत आहे, जे येत्या काळात घसरणीचे संकेत देत आहे. निफ्टीला 22,000 वर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट तुटला तर घसरण 21,700 पर्यंत वाढू शकते. वरच्या बाजूने, 22,160 वर रझिस्टंस दिसत आहे.
निफ्टीने डेली चार्टवर एक एनगल्फिंग बिअर कँडलस्टिक पॅटर्न तयार केल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. आता जोपर्यंत निफ्टी 22249 चा उच्चांक पार करत नाही तोपर्यंत त्यात घसरण राहील. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसू शकते. 21974 - 21930 च्या झोनमध्ये निफ्टीला सपोर्ट आहे.
विकली क्लोझिंग दरम्यान बँक निफ्टी इंडेक्सला अस्थिर व्यापार सत्राचा सामना करावा लागल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. त्याला 47,300 पातळीच्या आसपासच्या रझिस्टंसला सामोरे जावे लागले. सध्या तो 46,500-47,500 च्या मोठ्या रेंजमध्ये अडकला आहे.
जोपर्यंत बँक निफ्टी 47,300 चा रझिस्टंस पार करत नाही तोपर्यंत नवीन वाढ अपेक्षित नाही. यासाठी 46,800 वर सपोर्ट आहे. हा सपोर्ट तुटल्यास, विक्रीचा दबाव वाढू शकतो आणि इंडेक्स 46,500 पर्यंत घसरू शकतो.
बीपीसीएल (BPCL)
एनटीपीसी (NTPC)
कोल इंडिया (COALINDIA)
पॉवरग्रीड (POWERGRID)
विप्रो (WIPRO)
एम फॅसिस (MPHASIS)
पीएफसी (PFC)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.