Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कमाईची संधी! 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले, पण संपुर्ण दिवस अस्थिर राहिला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 440.33 अंकांनी अर्थात 0.61 टक्क्यांनी वाढून 72,085.63 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले, पण संपुर्ण दिवस अस्थिर राहिला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 440.33 अंकांनी अर्थात 0.61 टक्क्यांनी वाढून 72,085.63 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 156.30 अंकांच्या म्हणजेच 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 21,853.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी वाढीसह उघडला आणि 22126.80 च्या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला, मात्र, यानंतर जोरदार विक्री झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. त्यामुळे निफ्टी पुन्हा 21200 - 21900 च्या रेंजमध्ये गेला.

डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर वेगवेगळे सिग्नल देत आहेत, ज्याचा अर्थ निफ्टी एका श्रेणीत अडकल्याचे हे संकेत आहेत. बोलिंजर बँड रेंजबाउंड अॅक्शनचा संकेत देत आहेत. अशाप्रकारे, सर्व पॅरामीटर्स सूचित करत आहेत की मार्केटमध्ये कंसोलीडेशन सुरू राहण्याची शक्यता आहे.

या कंसोलीडेशन दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आणि सेक्टर रोटेशन सुरू राहण्याची अपेक्षा आहे. निफ्टीसाठी, 21660 - 21600 वर सपोर्ट आणि 22100 - 22150 वर रझिस्टंस दिसत आहे.

46900 - 47000 च्या झोनमध्ये बँक निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसला जो 48636 - 44429 पासून दिसलेल्या संपूर्ण घसरणीच्या 61.82% फिबोनाची रिट्रेसमेंट पातळीशी सुसंगत आहे. शॉर्ट टर्ममध्ये, बँक निफ्टीचे कंसोलीडेशन 47000 - 45500 च्या रेंजमध्ये अपेक्षित आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • ओएनजीसी (ONGC)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • एनटीपीसी (NTPC)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT