Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आरबीआयच्या कालच्या निर्णयानंतर आज कसा असेल बाजार? कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Investment Tips: आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने भारतीय बेंचमार्क इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 21,750 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 723.57 अंक अर्थात 1.00 टक्क्यांनी घसरून 71,428.43 वर आणि निफ्टी 212.50 अंक म्हणजेच 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह 21,718 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने भारतीय बेंचमार्क इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 21,750 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 723.57 अंक अर्थात 1.00 टक्क्यांनी घसरून 71,428.43 वर आणि निफ्टी 212.50 अंक म्हणजेच 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह 21,718 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती? How will the market condition be today?

22,000 च्या लेव्हलने बिअर्ससाठी चांगले काम केले कारण एमपीसीच्या यथास्थिती ठेवण्याच्या निर्णयामुळे खासगी बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्सचे मोठे नुकसान झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. त्यामुळे निफ्टीमध्ये करेक्शन दिसून आले.

निफ्टीने डेली चार्टवर लॉन्ग बियरिश कँडल तयार केली आहे. पण निफ्टी 21,700 ची लेव्हल तसेच 21 डीएमएचा सपोर्ट राखण्यात यशस्वी झाला. हा आता निफ्टीसाठी सपोर्ट बनला आहे. तर 21,900 वर रझिस्टंस दिसत आहे.

जर हा सपोर्ट तुटला तर 21,500 पर्यंत करेक्शन वाढू शकते. त्याच वेळी, पुन्हा नवीन अपट्रेंड सुरू करण्यासाठी, निफ्टीला 22,100 च्या वर चांगली क्लोजिंग द्यावी लागेल.

बँक निफ्टीमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. मागील तीन ट्रेडिंग सत्रांचा कंसोलिडेशन झोन डाउनसाइडवर खंडित झाला. बँक निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 44430 - 44000 पर्यंत घसरेल. वरच्या बाजूला, 45500-45600 च्या झोनमध्ये रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? What are today's top 10 stocks?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • बीपीसीएल (BPCL)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • ए यू बँक (AUBANK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

IND vs AUS 1st Test: अरे, आधी अम्पायरकडे बघ! Mohammed Siraj सेलिब्रेशन करत पळत सुटला, मग पुढे जे घडलं ते...; ड्रेसिंग रुममध्ये रोहितही दिसला

SCROLL FOR NEXT