Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय बेंचमार्क सेन्सेक्स-निफ्टी इंडेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या व्यापार सत्रात वाढ झाली. निफ्टी 22,300 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 560.29 अंकांनी अर्थात 0.77 टक्क्यांनी वाढून 73,648.62 वर आणि निफ्टी 189.40 अंकांनी म्हणजेच 0.86 टक्क्यांनी वाढून 22,336.40 वर बंद झाला. ऑटो, पीएसयू बँक, कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि रियल्टी इंडेक्स 1-3 टक्क्यांनी वाढल्याने सर्व सेक्टरल इंडेक्स वाढीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढले.
यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बाजार दबावाखाली आहे जे सुमारे 4.6 टक्के असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही.के.विजयकुमार यांचे म्हणणे आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) आणखी विक्री होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
अनिश्चिततेच्या या वातावरणात निफ्टीला 22,000 वर मोठा आधार दिसत असल्याचे एंजल वनचे समीत चव्हाण म्हणाले. त्याच वेळी, वरच्या बाजूने निफ्टीचा पहिला रझिस्टंस 22,300 वर दिसत आहे. निफ्टीने 22,430-22,500 च्या वर जाऊन मजबूती दाखवली, तर नवीन तेजीचा ट्रेंड सुरू होऊ शकतो.
कॉर्पोरेट निकालांचा हंगाम जसजसा पुढे जाईल तसतसे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन दिसेल असे मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, अनिश्चितता पूर्णपणे दूर होईपर्यंत चांगल्या दर्जाचे शेअर्स जमा करणे गरजेचे आहे.
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
बीपीसीएल (BPCL)
एल अँड टी (LT)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
व्होल्टास (VOLTAS)
लुपिन लिमिटेड (LUPIN)
कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
पॉलीकॅब (POLYCAB)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.