Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: चांगल्या जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips (Top Shares): शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सने पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि निफ्टीने 24,861.15 या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1,292.92 अंकांनी अर्थात 1.62 टक्क्यांनी वाढून 81,332.72 अंकांवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सने पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि निफ्टीने 24,861.15 या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1,292.92 अंकांनी अर्थात 1.62 टक्क्यांनी वाढून 81,332.72 अंकांवर आणि निफ्टी 428.70 अंकांनी म्हणजेच 1.76 टक्क्यांनी वाढून 24,834.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

प्रभुदास लिल्लाधरच्या टेक्निकल रिसर्च वाइस प्रेसिडेंट वैशाली पारेख यांनी सांगितले की, निफ्टीने 24,600 च्या वर जाऊन ताकद दाखवली, तर येत्या काही दिवसांत तो पुन्हा 24,850 च्या आधीच्या उच्चांकावर पोहोचू शकतो.

तर निफ्टी 24,000 अंकांच्या वर राहिला तर तो लवकरच नवीन उच्चांक पाहू शकेल असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बँक निफ्टीच्या डेली चार्टवर आउटसाईड डे पॅटर्न तयार झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. हे बाजारातील आणखी वाढीच्या शक्यतेचे संकेत आहे. याशिवाय बँक निफ्टीने 50-पिरियड एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज परत मिळवली आहे.

शॉर्ट टर्म ट्रेंडमध्ये बुलिश रिव्हर्सल दिसू शकतो. जर बँक निफ्टी 51,500 च्या वर जाण्यात यशस्वी झाला तर 52,500 च्या दिशेने चांगली तेजी दिसून येईल. 51,000 वर खालच्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे.

जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार वाढ दिसून आली. अमेरिकन वायदा बाजारातही तेजी दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टीमध्ये जवळपास 154 अंकांची वाढ दिसून आली. या भावनांचा परिणाम आज (29 जुलै) देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येईल. इंट्राडे दरम्यान काही शेअर्समध्ये जोरदार वाढ होऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • सिप्ला (CIPLA)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • आयडिया (IDEA)

  • पीआय इंडस्ट्रीज (PIIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT