Investment Tips in marathi Which 10 shares perform today  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips (Top Shares): सेन्सेक्स-निफ्टी मंगळवारी किरकोळ वाढीसह बंद झाले. रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. भारतीय बेंचमार्क इंडेक्स 16 जुलैला सलग तिसऱ्या सत्रात वाढीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी मंगळवारी किरकोळ वाढीसह बंद झाले. रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. भारतीय बेंचमार्क इंडेक्स 16 जुलैला सलग तिसऱ्या सत्रात वाढीसह बंद झाले.

सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिअल्टी इंडेक्समझ्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर एफएमसीजी, आयटी, मेटल आणि टेलिकॉम 0.3-0.9 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे मीडिया इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची घसरण दिसून आली.

तर पॉवर आणि कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.3 टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप मिडकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेवटी बीएसई सेन्सेक्स 51.69 अंकांनी म्हणजेच 0.064 टक्क्यांच्या तेजीसह 80,898.30 वर वाढीसह बंद झाला. तर निफ्टी 26.30 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांच्या तेजीसह 24,613.00 वर वाढीसह बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी मंगळवारी 24,600-24,650 च्या मर्यादित रेंजमध्ये फिरला आणि शेवटी 26.30 अंकांच्या वाढीसह 24,613.00 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे तर, एफएमसीजी आणि आयटीमध्ये वाढ दिसून आली. तर सर्वात मोठी घसरण मिडिया सेक्टरमध्ये झाली. फार्मा सेगमेंटमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे करेक्शन दिसून आले. मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये घसरण असूनही, या विभागातील निवडक शेअर्समध्ये खरेदी झाली.

विक्रमी स्तरावर सतत डोजी कँडल तयार करणे वरच्या स्तरावर कमजोरी दर्शवते असे आदित्य पुढे म्हणाले. पण, सपोर्ट लेव्हल प्रत्येक दिवसासह वरच्या दिशेने सरकत आहे. आता 24,500 वर निफ्टीला तात्काळ सपोर्ट दिसत आहे.

निफ्टी सकारात्मक ट्रेंडसह उघडला आणि नंतर दिवसभरात मजबूत झाला आणि 20 अंकांच्या किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टी 24840 अंकांच्या दिशेने जात आहे.

आवर्ली चार्टवर गती कमी होण्याची चिन्हे आहेत कारण तासाभरातील मोमेंटम इंडिकेटरमध्ये नकारात्मक क्रॉसओव्हर आहे आणि बोलिंजर बँडने देखील आकुंचन सुरू केले आहे. जे पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये कंसोलिडेशन होऊ शकते याचे संकेत आहेत. या कंसोलिडेशनची रेंज 24700 - 24500 असण्याची शक्यता आहे.

बँक निफ्टी 20-डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या आधारावर एकत्र येऊन बंद झाल्याचे जतिन गेडिया पुढे म्हणाले. पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये बँक निफ्टीने हा सपोर्ट राखून 52800 - 53000 पर्यंत जाण्याची आशा असल्याचे ते म्हणाले. बँक निफ्टीला 52100-51900 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बीपीसीएल (BPCL)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT