Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडेमध्ये पैसे कमावण्याची सुवर्ण संधी; तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात वाढ दिसून आली. बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. निफ्टी 22,186.65 च्या नवीन इंट्राडे सार्वकालिक उच्चांकाजवळ बंद झाला. मिश्र जागतिक संकेतांमध्ये बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली, पण सुरुवातीच्या तासांत बरीच अस्थिरता होती.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 281.52 अंकांनी अर्थात 0.39 टक्क्यांनी वाढून 72,708.16 वर बंद झाला आणि निफ्टी 81.60 अंकांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी वाढून 22,122.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीसह झाली असे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. 22,100-22,150 च्या रेझिस्टन्स झोनमधून निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि निफ्टीला या रेझिस्टन्सच्या वर बंद करण्यात यश आले नाही.

मंगळवारच्या कँडल्स दोन्ही बाजूला लॉंग शॅडो आहेत. बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे हे लक्षण आहे. आवर्ली चार्टवर आपण डायवर्जंससह नेगिटिव्ह क्रॉसओवर दिसत आहे. अशा स्थितीत निफ्टीमध्ये 21970 - 21930 च्या सपोर्टच्या दिशेने थोडी घसरण दिसू शकते. एकूणच, निफ्टी एका महत्त्वपूर्ण वळणावर असल्याचे दिसून येत आहे.

बँक निफ्टी सतत वाढत आहे. मात्र, गती मंदावली आहे. आवर्ली चार्टवर नेगिटिव्ह क्रॉसओव्हर आणि नेगिटिव्ह डायवर्जंसह मंदीचे संकेत मिळत आहेत. जर बँक निफ्टीमध्ये 46200 - 46100 च्या दिशेने कंसोलिडेशन असेल तर त्यात लॉन्ग पोझिशन्स तयार करण्याची चांगली संधी असेल. वरच्या बाजूला त्याचे शॉर्ट टर्म टारगेट 47000 - 47200 असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ग्रासिम (GRASIM)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • सिप्ला (CIPLA)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: 'सलमान सरांचे काहीही वाईट होऊ शकत नाही', लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीवर कुणी दिली प्रतिक्रिया?

Latest Weather Updates: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळचा धुमाकूळ! 'या' राज्यांना फटका; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

World Osteoporosis Day 2024 : जर तुम्ही या सवयी सोडल्या नाहीत तर तुमच्या तरुणपणातच सांधेदुखीची समस्या भेडसावेल

अधिक मुलांना जन्म द्या... मुख्यमंत्र्यांचा लोकांना सल्ला, सवलत देण्याची आखली योजना

False Bomb Threats: बॉम्बच्या प्रत्येक खोट्या धमकीमागे विमान कंपन्यांना कसं होतं 3 कोटींचं नुकसान? जाणून घ्या काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT